श्री
श्री,
आपल्या हातून भगवंत कार्य करतो. आपल्याला बनवणे, आपल्या वृत्ती, विचार, भावना, नाती, गती, परिणाम, संबंध, आकार, येणे, जाणे, अनुभवणे, जाणीवा...सर्वांच्या पाठीमागे तो आहे - म्हणजे त्याच अस्तीत्व आहे. अस्तित्व हा भाव आहे, वेगळी वस्तू नाही की ज्या बद्दल मी बघीन, विचार करीन, हाताळून बघीन, प्रबोधन करीन, प्रतिक्रिया देईन वगैरे!...त्या भावातून वृत्ती आणि दृश्य अश्या साऱ्य संकल्पना "निर्माण होत राहतात". त्यातून "मी" (हा भाव) घडतो आणि क्रिया करतो त्या भावातून. म्हणजे क्रिया कशी घडते, तर त्याच उत्तर "भाव" आहे, मी नाही! म्हणजे "मी" खूप साऱ्या स्तरातून झालो आहे आणि त्याच्या परिणामामुळे प्रतिक्रिया देत राहतो!...मला (म्हणजे त्या भावाला) वेगळेपणा जाणवतो, म्हणून त्या प्रमाणे प्रतिक्रिया देण्याची गरज भासत राहते. म्हणजे थोडक्यात कार्य भाव करत आहे, त्याचा परिणाम आहे, ज्याला "मी" स्वतः समजतो आणि धरून राहतो. ही गोष्ट तरीही उमगायला किंव्हा जाणिवेत यायला खूप काळ घालवायला लागतो. ती भगवंताची इच्छा मानुयात.
अनुभव येऊ द्यावेत. त्याच्या पाठीमागचा प्रयोजन नाही कळणार आपल्याला, पण त्या कारणासाठी आपल्या पदरी पाठवले गेले आहेत. त्यातूनच प्रवास घडतं जाणार आहे. आणि त्यातूनच अनुभावतेच स्वरूप मोठ्ठ होत राहणार आहे. ते कसं, ते भगवंतावर सोडणे. सध्या त्याच कार्य आहे, जी जाणीव वाढवत राहणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home