Saturday, June 29, 2024

श्री

 श्री 


अनेक आकार, ज्या अनंत सूक्ष्म स्तरातून येतात आणि मनावर परिणाम करतात - हा दृश्याचा स्वभाव झाला. स्वभाव म्हणलं तर हे सगळं होणार, त्या शक्तीच्या कार्यातून जे जीवाच्या जाणीवेच्या पलीकडे असते किंव्हा जी जीवाची जाणिव तैय्यार करायला कारणीभूत ठरते. म्हणून आपण कोण, कुठून आलो, कुठे जाणार आहोत वगैरे - हे पूर्णपणे भगवंताच्या शक्तीवर गोष्टी सोडणे. बुद्धी दृश्याच गुणधर्म उचलते, म्हणून चक्रात वावरते. त्यातून प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळत नाही जर विचारांचा गुणधर्म बघितला तर. पर्यायाने _समाधान_ स्थिती विचारांच्या चौकटीत नसते...ती वेगळी मनाची स्थिती आहे, ज्यात विचार स्थिरावतात. 

स्थिरावणे - हे संस्कार देणे आहेत मनाला. ते कुठल्याही माध्यमातून होऊ शकतात कारण कुठलीही वृत्ती शेवटी शांत होऊ शकते. म्हणजे सत्याची जर भाषा सांगितली तर एका शांतीतून अनेक प्रकारच्या वृत्ती, स्थिती, बुद्धी, भावना होत राहतात. म्हणून स्वतःचा मार्ग ओळखणे. त्यात दुसरा कुणी काही करू शकत नाही. 

दृश्य किंव्हा आकार, हे वृत्तीतून आणि अनेक क्रियेतून निर्माण होत राहत. बुद्धीचा स्वभाव असा की एका दोरी सारखं घटकांचं संबंध जोडत राहते. तसे संबंध असतात असे नाही. _किंव्हा बुद्धी सत्य कडे जशी बघेल तसे *संबंधांचे* स्वरूप दिसून येत!_ म्हणून एका स्थितीमुळे दुसरी होते त्यासाठी कार्य करणे हे तत्व पूर्णपणे लागू होऊ शकत नाही. किंव्हा अस्तित्वाला "विषय" समजणे किंव्हा logic ने त्याकडे बघणे हे तात्पुरत्या गोष्टी समजाव्यात. त्यात मनस्ताप निघून नाही जात! म्हणजेच की "logic" ही एका प्रकारची मर्यादित विचार करण्याची पद्धत आहे. त्याच्या आणखीन पलीकडे सूक्ष्म पद्धती आहेत विचार करण्याचे किंव्हा जाणीव घडवण्याचे. सध्या आपण विचार "कोड सोडवणे" ह्या पद्धतीने त्याकडे बघतो. जर अस्तीत्व कोड नसेल तर?!!...

म्हणून सूक्ष्म होणे म्हणजे संबंधांचे स्वरूप किंव्हा नाती बदलणे - खूप क्रिया अनुभवणे...खऱ्या अर्थाने तसे केले, तर त्याला विवेक बुद्धी म्हणतात. _असार टाकून सार ग्रहण करणे..._ 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home