श्री
श्री
भगवंताच नामस्मरण करण्यानी स्थिरपणा अनुभवायला मिळू शकत. भगवंत वस्तू नाही...म्हणजे दृश्यातील वस्तू सारखी त्याकडे बघू नका. दृश्यातील वस्तूचा स्वभाव निराळा असतो, कारण तो दृश्याचा स्वभाव घेऊन निर्माण झाला असतो. दृश्यात वस्तू मध्ये संबंध, बदल, अर्थ, गुंतणे, तत्पुर्तेपणा, अपूर्णेपणा, गती, गुण हे गुणधर्म असतात. वस्तू वेगळी दिसून येते, म्हणून ती हवी किंव्हा नको अशी आपली बुद्धी निर्णय देत राहते.
भगवंत वस्तू ही स्थिती आहे, जी वृत्ती शांत केल्यामुळे येते. भगवंताची स्थिती म्हणजे उन्मन अवस्था, आतील स्थिती. म्हणून ती "वेगळी" दिसत नाही किंव्हा "वेगळी" काढता येत नाही. आपल्याला वस्तू सध्या दिसते, किंव्हा तिचा परिणाम स्वतःवर करून घेतो, ह्याचा अर्थ की आपण आणि आतील भगवंताची स्थिती अजून भिन्न आहेत; आपल्याला अजून त्याच्या पर्यंत पोहोचायच आहे. "प्रवास" म्हणला तर तो आतील आहे, आतील स्थिती "होण्याचा" आहे, जीचा संबंध बाहेरील घडामोडींशी बुद्धीच्या बळावर (logic वर) आधारित नसतो. म्हणून तो प्रवास गूढ आहे.
श्रद्धा ठेवा.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home