श्री
श्री
बहिर्मुख वृत्ती ठेवणे म्हणजे कृती करण्याचा अट्टाहास धरणे, सिद्ध करणे, उतावळे होणे, प्रतिक्रिया देण्याचा अट्टाहास असणे, मत मांडणे, सैय्यम न राखणे, बदलांची भीती वाटणे, गुंतागुंतीचा त्रास होणे वगैरे. हे जाणिवेच एक रूप आहे. जी वस्तू दिसते आणि अनुभव निर्माण करते, त्या अर्थाचं मूळ स्वतःच्या मनात असतं. ज्या प्रकारे वृत्ती निर्माण होते, तसा अर्थ किंव्हा दृश्याशी संबंध येतो. थोडक्यात सर्व निर्मितीचा खेळ आहे.
गोष्टी असणार आहेत, त्या बदलणार आहेत आणि त्या येणार आहेत, त्या जाणार आहेत. हा प्रवाह कायम आहे. आपल्या वाचून काही जग थांबत नाही किंव्हा घडतं नाही. जे इतरांच आहे, तसं आपलही आहे. आपण येणार, बदलणार आणि जाणार कुठल्यातरी स्थितीत किंव्हा स्तरात. अर्थात अश्या प्रकारे विवेक विचार निर्माण होणे हे देखील भगवंताची इच्छा - की मानव जीवाला ही गोष्ट जाणवू शकते. म्हणून प्रयत्नांच महत्व इथे येतं.
प्रयत्न करत असताना दुसऱ्यांना त्याची कल्पना द्यावी हे मुद्दाम करण्याची गोष्ट नसावी. दुसऱ्यांना वृत्तीतून येणाऱ्या प्रश्नाची व्यथा सांगता येऊ शकते का, हा मला पडलेला प्रश्न आहे, जो स्वतः मध्ये सोडवायचा आहे. माझ्या मते, वृत्तीच्या हालचाली आणि परिणाम, ह्या गोष्टी चर्चे मध्ये समाधान पूर्वक आणण्यात अडचणी असू शकतात.
म्हणून अंतर्मुख होण्याचा प्रवास सांगता येत नाही आणि तोच त्या प्रवासाचा गुणधर्म असावा. ह्या वरून कळेल की विचारांची एक मर्यादा आहे, जिच्यात आपण गुंतलो तर बहिर्मुख गोष्टींची चर्चा होते, पण त्या पलीकडे (सूक्ष्म प्रकृतीच्या गोष्टी) विचार पोहोचू शकतं नसावेत.
त्रास किंव्हा दुःख कुठून येतो, हा अंतर्मुख होण्याचा प्रवास आहे. त्यात आपण बऱ्याच वेळेला परिस्थिती किंव्हा दुसऱ्यांना दोष देत राहतो. त्याने काही हाती लागत नाही. कारण त्रासच मूळ कुठेतरी आत आहे, जे जर ते अनुभवलं, तर आपण शांत होऊ.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home