श्री
श्री
सर्व गोष्टी शांतपणे करणे. शांत म्हणजे स्वार्थी हेतूच बीज नसणे. असे का, कारण हेतू ठेवला तर कृती केल्याचे परिणाम, जे काही असतील, ते भोगायला लागतात - म्हणजे ते मनाला चिकटून राहतात - म्हणजे कुठल्यातरी दृष्यावरून, वस्तू वरून, स्थितीवरून, आकार वरून मन कृती करत राहते.
चिकटून राहणे म्हणजे विषय निर्माण करत राहणे, त्याचाच विचार चक्र निर्माण करणे, त्याच्यावरून सुखाची किंव्हा दुःखाची व्याख्या निर्माण करणे, त्याचं अस्तीत्व, बदल, तत्पुर्तेपण ह्याच्याशी एकरस होणे, दृश्य जगाच्या हालचालींना खूप सत्यता देणे वगैरे....एकंदरीत दृश्यांची बाधा ( भय, चिंता, त्रास, काळजी ) होत राहणे.
अस्तीत्व हे मन आहे - जाणीव आहे. त्याला माध्यम जरी म्हणालो तरी त्यात क्रिया, संकल्पना, परिणाम, वासना, विचार, भावना, आकार गुण हे सारे " घटक " आले - त्यावरून आपला " भाव " निर्माण होतो, स्मरणात येतो आणि त्याप्रमाणे आपण प्रतिक्रिया देतो.
थोडक्यात अस्तित्वाच्या माध्यमामध्ये जी उपजत शक्ती आहे, त्यावरून अनंत स्तर, संबंध, क्रिया, कार्य, गती, बदल होत राहतात - _मनुष्य जाणीव_ त्यातील एक प्रकार आहे, ज्यात विचार आणि भावना आल्या. ते त्याच एका शक्तीचे कार्य आहे!
मूळ ओळखायचे असेल, तर भगवंत जाणून घेणे. आपल्या जाणिवेत त्या भावाला निर्माण करणे आणि तिथेच लक्ष केंद्रित करणे. म्हणजे मनावर तशे सतत संस्कार देत राहणे, जेणे करून दृश्य जगाचा भाव ढिला होऊन त्याची जागा भगवत भाव घेतो.
हे सांगणे सोप्पे आहे, करणे तितकेच कठीण - कारण दृश्यशी संबंध, वासना, कृती हे खूप काळापासून आपण घेऊन आलो आहे - त्याला इतका सत्यपणा दिला आहे की भावाचे रूपांतर " आकारात " झाले आहे! आकार सत्य वाटतो, जे समोर नाही आहे!!
म्हणजे अंतःकरण शुध्द करणे ह्याला प्रयास लागणार आहेत.
श्रद्धा ठेवा. गोष्टींचे होणे, येणे, वावरणे, आकार - हे सारे भगवत इच्छेपोटी होत राहते.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home