श्री
श्री
बुद्धीच्या पलीकडे व्हायला, म्हणजे श्रद्धा भाव निर्माण करायला प्रयत्न आणि कृपा दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. आपल्या जीवाच्या हातात प्रयत्न आहेत. तर तसे करावे आणि बुद्धी कसून वापरून, भगवंताला गोष्टीतून कळून घेणे. जर बुद्धीचा योग्य उपयोग करून घ्यायचा असेल, तर आपले इथे कार्य काय आहे, हे ओळखणे आणि तशी जाणीव करणे.
वरील गोष्टी करत राहताना भगवंताची कृपा होण्यासाठी प्रार्थना करायलाच लागते. ते का, कारण आपण परावलंबी आहोत आणि खूप सूक्ष्म आणि खोलवरच्या प्रक्रियेतून आपण निर्माण होतो, बुद्धी चक्र चालू राहते आणि अनुभव येत राहतात. त्यासाठी पूर्ण श्रद्धा त्या शक्तीवर ठेवली तरच स्वतःचा स्वभाव _बाधत नाही._ म्हणजे दुसऱ्या शब्दात _स्वभावाचे भोग असतात._ बुद्धी, भावना, देह, इंद्रिये ह्यांचे परिणाम होतात. ते भगवताकडून आले आहेत आणि निघूनही जातील ही श्रद्धा बाळगावी. सर्व प्रवाह आहे, शक्ती आहे, प्रकृती आहे, कार्य आहे. त्याला सुरुवात नाही, ना शेवट. त्याला हेतू नाही. म्हणजे ते राहणार/ असणार/ प्रचितीला येणार/ प्रकट होत राहणार. _प्रकट होणार_.
ही क्रिया किंव्हा कार्य ओळखणे हे अध्यात्माचे ध्येय आहे. तरीही ध्येय हा फक्त बौद्धिक शब्द नाही - श्रद्धेचा आहे. Realization out of trust.
नामस्मरण करणे आणि करत राहणे हीच क्रिया सर्वात मोलाची आहे.
हरि ओम.
श्री
आयुष्य ही भगवंताची कृपा आहे. तो ठेवील त्या परिस्थितीत, चक्रात, स्वभावात समाधानी राहणे. आयुष्य हे श्रद्धेने शांत होते, फक्त बुद्धीने नाही.
जी काही बौद्धिक छटा जीवनात येऊ पाहत आहे, तिच्या आहारी पूर्ण जाऊ नये असे वाटते. बुद्धीचा स्वभाव असतो, आणि त्याला चिकटलो, तर तो तापदायक होऊ शकतो. बुद्धीची खूप सवय होणे ( _आदत से मजबूर_ किंव्हा force of habit) कितपत चित्ताला हितकारक आहे, हे स्वतःला विचारा!
मग त्यातून योग्य वापर कसा करावा हे उमगतं जाईल. तो झाला आपला घडणारा प्रवास आणि भगवंताची कृपा.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home