श्री
श्री
उगाचच घाई करून काहीही पदरी पडत नाही. घाई, ही क्रिया, हेतू ठेवून, परावलंबन असून, दृश्यात होत असते म्हणून आलेली गोष्ट लगेच निघूनही जाते आणि आपण असंतुष्ट राहतो! दृश्याचा गुण धर्म तोच असल्यामुळे इथल्या हालचाली हेतू ठेवूनच करायला लागतात आणि ते अपरिहर्याने परिणाम करतात मनात आणि आपण चक्रात गुंतून राहतो! म्हणून एखादी गोष्ट नंतर केली काय किंव्हा नाही केली, तरी त्यातून आपण ठरतं नाही आणि आकाश काही कोसळत नाही! हे ध्यानात ठेवावे.
बुद्धी वापरली तर एकातून एक अशी न संपणारी हालचालींची साखळी चौफेर दिशेने पसरत राहते, म्हणून त्यातून हालचाली होतात, समाधान मिळत नाही! म्हणून अस्तित्वाचे कोडे सोडवण्यासाठी बुद्धी बाजूला ठेवणे आणि श्रद्धा वाढवणे. एखादी गोष्ट व्हायलाच पाहिजे, हा भाव हेतू ठेवून किंव्हा अहं वृत्तीतून उमटतो. त्यातून देखील क्रियेचा स्वरूपाची साखळी समजून घेण्याचा अट्टाहास बुद्धी करते. सूक्ष्म होण्याचाही अट्टाहास धरते. तिथे परत चूक होते आपली.
भगवंताची क्रिया सहज साध्य किंव्हा श्रद्धेने कळते, दुसऱ्या कशानेही उलगडत नाही. म्हणून त्याला शरण जावे. शरण म्हणजे श्रद्धा प्रकट करणे. श्रद्धेने असणे, श्रद्धेने राहणे.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home