श्री: प्रश्न
श्री: प्रश्न
प्रश्न येणे स्वाभाविक आहे. तो आपला किंव्हा जीवाचा गुण धर्म आहे. प्रश्न येणारच आणि याचा अर्थ की शोध राहणार आणि त्याचा अर्थ की निर्मिती चक्र समजून घेण्याची धडपड असणार. मी कोण किंव्हा स्मरण म्हणजे काय हे मूळचे प्रश्न राहतील. प्रश्नाचे अर्थ म्हणजे शक्ती जागी होण्याचा प्रयत्न.
त्यातून वेगवेगळे स्थिती, वेगळे प्रश्न, पचवण्याची ताकद वाढणे वगैरे. हा अंतर्मुख होण्याचा प्रवास - कुठे, काय, कसे, केव्हा, का नेईल माहीत " नाही " म्हणून श्रद्धेचे महत्व, स्थान, जाणीव, भाव.
प्रश्न म्हणजे चक्र याचे कार्य, क्रिया, हेतू निर्मिती, परिणाम, अनुभव, घटक. हे असणार.
प्रश्न म्हणजे तात्पुरतेपणाचा अर्थ समजून घेणे, त्याला न बीचकणे, शांत होऊ देणे, स्थिर होणे, श्रद्धेने राहणे.
सूक्ष्मातून दृश्यात शक्तीला अवतरू देणे हे ही महत्वाचे आहे. सूक्ष्म म्हणजे काय, हे प्रश्न जागृत ठेवणे. शोधातून कार्य करणे, वेगळेच घडणे, ते स्वीकारणे, आणि शांत राहणे. येणे, वावरणे, जाणे ही क्रिया स्वीकारणे. अस्तित्व कार्य स्वीकारणे. स्वभाव स्वीकारणे, तो भाव स्वीकारणे, भगवंताचे कार्य ह्यावर श्रद्धा ठेवणे, स्वतःचा मार्ग चालत राहणे, त्यावर श्रद्धा ठेवणे.
कुठे, काय, कशे, कुणी, केव्हा - हे प्रश्न अवतरू देणे आणि शोध ठेवणे.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home