Friday, November 15, 2024

श्री : स्मरण

 श्री : स्मरण


आपण जिवंत आहोत ह्याचा अर्थ जिवंत आहोत! ती भावना अनेक सूक्ष्म ते स्थूल संबंधीत क्रियेतून प्रज्वलित राहते आणि क्रियांमध्ये हालचाली जाणिवेत दिसून येतात आणि त्यात आपण गुंतून राहतो. क्रियांचा एक परिणाम म्हणजे स्मरण _होण्याची_ पद्धत (awareness of existence) आणि त्यामुळे होणारे भोग आणि परिणाम आणि चक्र आणि बदलांचा अर्थ. मुख्यतः कार्य आहे _असण्याचे आणि त्यावरूनच होण्याचे._ 

म्हणून आठवण किंव्हा स्मरण होणे/ राहणे ही देखील क्रियेतून _निर्माण_ झालेली गोष्ट आहे. त्या स्मारणाला आपण घट्ट पकडून ठेवतो म्हणून आयुष्य किंव्हा व्यवहारात आपण वावरतो. 

स्मरण अनेक प्रकारचे असू शकते. आत्ताच्या काळात सुद्धा समरणाची संकल्पना आहे जशी पूर्वी वेगळ्या प्रकारे होती/ असावी. तरीही स्मरण का असावे, हा स्वतःला प्रश्न विचारला, तर तो अस्तित्वाचा गुण धर्म आहे हे ध्यानात येईल. मग अस्तित्वाचे स्मरण आणि जीवाचे स्मरण ह्यात कसा फरक असतो, या बद्दल विचार सुरू होईल. त्यातून निर्णय होईल आणि प्रवास सुरू होईल स्मरण शुध्द होण्यासाठी.

स्मरण _शुध्द_ होण्याची क्रिया म्हणजे नामस्मरण. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home