Tuesday, November 05, 2024

श्री

 श्री 


ज्याचे विचार करतो, त्याचे सामील होणारे सर्व चक्र आणि परिणाम प्रकट होतात. आपणही तसे परिणाम मधून आलो आहोत आणि चक्रात वावरत असतो. त्या चक्राचा परिणाम म्हणजे एका _प्रकारचे_ स्मरण. 

प्रयत्नात ठरवणे की कसला विचार करावा किंव्हा चक्र निर्माण करावे? त्यातून त्या पद्धतीने इतर साखळीतले वृत्ती, विचार, भावना बरोबरीने येतात किंव्हा निर्माण होत राहतात. ते आदृश्यातून येतात आणि परत तिथेच जातात - तात्पर्य असे की अदृश्य सर्व गोष्टींची घडामोडी करते. प्रकट होणे ही क्रिया विलक्षण आहे आणि ती आपल्या स्वभावामुळे आपण आकर्षित करतो - आपण देवाकडे विषय मागतो आणि तोच ते देतो! आपण देव मागत नाही, मग तो का भेटेल?! 

बदल, स्थळ आणि काळ हे विचारांच्या स्वाधीन नाही....स्थळ आणि काळ ह्यातूनच विचार येत राहतात. म्हणून स्थळ आणि काळ हे आपल्या आतच असते हे ओघाने आले. किंबहुना विचार, स्थळ आणि काळ हे _एकाच_ शक्तीचे वेगळे आणि _संबंधित_ चक्र आहे. ज्याला बाहेरून आपण स्थळ किंव्हा काळ म्हणून ओळखतो, ते आत विचार म्हणून प्रकट होते! ह्यातून हे ही ओघाने आले की जसे विचार, तसे स्थळ आणि काळाशी आपले संबंध!  दृश्य म्हणजे _विचारांनी केला गेला संबंध._ 

 _All_ is a pattern. And a pattern is taking up a "form" which is connected with other patterns. Pattern is existential or living, full of awareness, full of action and has effects. _Pattern creates forms._

Are we in control of any patterns?! This is a fundamental inquiry. All patterns are our own extensions. To know a pattern, we ought to know our origin, which is consciousness. 

सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की शांती रस मध्ये स्थिर होणे. तिला काही माप दंड लागत नाही. तिच्यात फक्त स्थिर होणे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home