श्री
श्री
All is a matter of vibrations. Those take on various forms, tendencies, connections, characters, attitudes, perceptions, meanings..
This is referred to as God's Action or Divine Will. Vibrations _seem to create_ movement or motion or change and this apparent movement is perceived by 'differences' of tendencies. So perception is a function of vibrations (awareness).
The equation is not stated to decode problems of the mind. Decoding is not the answer to fixing. It is a process to only realise the _action of things._
वरील विचाराचे बरेच अर्थ होतात - ते सर्व अर्थ शांत होण्यासाठी करावे अशी प्रार्थना आपण करू.
"मी" ही एक जाणीव आहे, नैसर्गिक आहे, सुरुवात आहे. त्याचा त्रास होतो हे ध्यानात येऊ देणे. जो पर्यंत हा भाव आहे, तो पर्यंत खटपट आहे, अपुरेपण आहे, वेगळेपण आहे, स्पर्धा आहे, परावलंबन आहे, चक्र आहे, _जर - तर_ अशी वृत्ती आहे. म्हणून ते किती प्रमाणात पुढे न्यावे हा विचार करावा.
इंद्रियांना आपण महत्व देतो. त्यांच्या द्वारे दृश्याचा अर्थ आणि चक्र आपण निर्माण करतो आणि त्यात गुंतून राहतो. जो काही असंख्य आकारांचा वावर दिसतो, तो मनोरचनेमुळे आहे, आणि त्यात अहं भाव असल्यामुळे एका प्रकारचा _संबंध - चक्र_ त्या आकारांशी होत राहतो, म्हणून भोग आपण झेलतो. अहं भाव थोडक्यात वेगळेपणाचा अनुभव निर्माण करतो.
तरीही, ह्याचं संकल्पनेतून, भावातून सुरुवात करून _पलीकडे_ जायचे आहे. *ते शक्य आहे.* ज्या प्रमाणात जाणीव असते, त्या प्रमाणाचे अनुभव पदरी येतात. दुसरी गोष्ट अशी, की माणसे त्यांचे मन वेळ आली की मोकळे करतात, त्यांना डिवचले तर ते उपयोगी ठरतं नाही. तसेच वेळ आली, की आपण पूर्ण मोकळे होतो - त्यासाठी प्रयत्न करणे.
जर - तर ही खूप खोलवर, परावलंबी असलेली संकल्पना आहे. तसे ओरबाडून ती निघत नाही. त्याला स्वीकारून नमवायला लागते. त्या प्रक्रियेत असंख्य अनुभवांचा स्वीकार करायला लागतो.
शेवटची गोष्ट ही की भगवंताचे नाम ही शक्तीच आहे. म्हणजे तिच्या संकल्पनेतून, संस्कार घडून, मन शांत होते. ही खूप प्रखर आणि महत्वाची प्रक्रिया आहे. जे काही आपण आहोत आणि काहीही करत आहोत, ते प्रक्रियेमुळे होते. म्हणून शांती रस प्रकट केले, तर त्याची प्रक्रिया काय असेल?!!...
म्हणून नामस्मरण.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home