श्री
श्री
आपण चिंता किंव्हा विषय का ध्यानात आणतो, हे कारण गूढ आहे. त्या गूढ कारणला भगवंताची इच्छा आपण मानतो, अंतर्मुख झाल्यावर. अंतर्मुख होणे आणि त्यावरून आपण कसे होतो, घडतो, संबंधात राहतो, वावरतो हे विचार ध्यानात येऊ पाहतात. ते अभ्यासाने जोपासले तर सत्याचा शोध सकारात्मक होऊ पाहतो. ती विशिष्ट शैली घेऊन आपण आलो आहोत, म्हणून सर्व अनुभवांचा अर्थ, निर्मिती, संबंध - याचे विचार येणारच. ते डावळून पळवाट पकडण्या सारखे आहेत. तसे ही लोक करतात - तर ते त्यांना करू द्यावे, कारण न जाणो कधी सत्याचा प्रकाश ध्यानी यावा!
त्यातील एक गोष्ट अशी की मन आणि अस्तीत्व भाव हे काय आहे? मन अस्तीत्व माध्यमातून येत म्हणजे नेमके काय? आणि त्यातून स्मरणाची व्याख्या कशी बदलू पाहते किंव्हा कार्य करते किंव्हा घडते?
या प्रश्नांचे उत्तरं जाणिवेतून येतात. ते येणार. त्याला येऊ देणे आणि तसा प्रवास स्वीकारणे - म्हणजे पूर्ण श्रद्धा ठेवून प्रत्येक टप्प्यातून काय पुढे होईल, याची काळजी करणे *बंद करणे.* वेगळेपणामुळे होणारी काळजी *बंद करणे.* भावनेतून आणि बदलणाऱ्या वृत्तीतून घडणारी काळजी *बंद करणे.*
बुद्धी किंव्हा आपले सारे रूप "काळजी" करते, कारण ते विषयात स्वतःचे अस्तीत्व किंव्हा सिद्धतव बघते. म्हणून तेच तेच विषय प्रकट करत राहते. विषय सूक्ष्मातून उद्भवते आणि स्थुलात आकारात येते. म्हणून कुठल्याच गोष्टीची शाश्वती, येणे आणि जाणे आपण ठरवू शकत नाही. त्यांनी अजिबात चिंता न करणे, कारण चिंता कधीच संपत नाही आणि ती एका विघटित भावनेतून आली असते.
म्हणून स्वच्छ पारदर्षकतेने कृती करणे महत्वाचे आहे. तो भाव आहे. त्यानेच आतून आपण शुध्द आणि शांत होतो. कृती कसे करावे, हे बाहेरील गोष्टींवरून ठरतं नसते (त्यात आपल्या वृत्तीमुळे भेसळ पद्धतीने परिस्थिती दिसते) - ते "योग्य काय करावे" याने ठरलेले असावे. योग्य जर गोष्टी केल्या, तर मन सूक्ष्म होऊन, समवेदशिल होते, शांत वाटतं, श्रद्धा वाढते आणि स्वार्थीपणा गळून पडतो. त्याच्या उलट संकुचित भाव निर्माण केला, तर त्याचा संस्कारांमुळे आपल्याला सतत त्रास आणि घाबरणे हे हाताळायला लागत. सर्व वृत्तीचा खेळ आहे.
आपल्याला जो जन्म दिला आहे, तो चिंतेत राहण्यासाठी नाही - तो सत्य होण्यासाठी दिला आहे - हे अगदी मनात पक्के धरणे. एकदा हे पक्के केले (त्याला ही प्रवास आहे) की प्रारब्ध काहीही असो, त्याने घाबरणे होत नाही.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home