श्री
श्री
वरील लेखावरून खूप भावना आपण सादरी करू शकतो...
आत काय चालू असते आणि त्या भावनेतून होणारे क्रिया आणि अपुरेपणामुळे मन कुठेतरी शाश्वत आधार घेण्याचे बघते. त्यातूनच भावना, चक्र, वस्तू, परिस्थिती, अपेक्षा आपण धरून ठेवतो - संकल्पना अशी की एखादे काम केलं, कृती केली, ताबा मिळविला की शाश्वत आनंद मिळू शकेल किंव्हा "सुरक्षित" वाटेल. हे प्रकरण खरंच गूढ आहे, ज्याला उत्तर नाही - म्हणूनच त्यावरून गोष्टींचे येणे, वावरणे, गुंतून राहणे, जाणे, दुःख होणे वगैरे अनुभवात येत राहतात. त्यातून असे बघावे की आपली वृत्ती कुठे चिकटून राहते आणि तिच्या या वागणुकीला स्वीकारून हळूवार पद्धतीने शुध्द जणीवेकडे वळवावी. म्हणजेच की सिद्ध होण्याची क्रिया काहीही करण्याने होत नाही, ती स्वतः सिद्ध असते. त्यासाठी कुठल्याही विषयाला चिकटण्याची गरज नाही सुरक्षित वाटण्यासाठी.
विषय, जे वृत्तीतून येत राहतात ते बदलणारे असतात, कारण शक्तीचा गुण असतो तो. त्यातून एक प्रकारचा भाव होतो, ज्यात "आपले" मन आणि दृश्य हे दोन अंगे आहेत. म्हणून वृत्ती शांत झाली तर आपल्याला स्वस्थता येईल.
तात्पुरतेपण धरल्यामुळे, ते नाहीसे करण्यास संकल्पनांना आपण धरून राहतो - पूरक होण्यासाठी. त्यातून ममत्व, माया, अहं - हे गोष्टी येतात. बघून, ऐकून, बोलून, वागून आपण दुखावतो किंव्हा सुखावतो. कुणी काही बोललं तर मनावर आघात होतात. ते का होत असेल, याचा विचार करावा. आपण का दुखावतो, त्याच्या पाठीमागे काय काय दडलेले असते म्हणून त्याला इतकं प्राधान्य दिलं जातं?! हे ही शांतपणे समजून स्वीकार करणे. त्यातून शांत होण्याचा मार्ग उलगडेल.
आपल्या भोवतालची कुठलीही गोष्ट स्थिर असतं नाही, की आपणही नाही आणि प्रकट पाहणाऱ्या वृत्तीही नाही. त्याची भीती वाटते कारण हे सर्व काही असुरक्षित भाव निर्माण करते. त्याचा परिणाम असा की आपण स्वतःवर किंव्हा पर्यावरणावर ताबा मिळवण्याचा दाटून प्रयत्न करत राहतो. निष्पन्न काही होत नाही, कारण त्या वृत्तीतून शाश्वत शांती कुठे मिळते?! If one considers the history of "mining" it can suggest clues to the extent of exploitation we cause to our selves and environment. But we don't stop!
तात्पुरतेपण स्वीकारणे - ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. की अस्तीत्व म्हणजे "मी" नाही; ती असतेच; तिचे कार्य होत राहते; ती बदल आणते - मग कसला तो अट्टाहास ताबा मिळवण्याचा?! सर्व भगवंताची शक्ती करते, तर त्यावरून तिचे प्रयोजन निश्चित असेलच आपल्या भल्यासाठी ही. अशी श्रद्धा हवी.
बुद्धिमुळे किंव्हा रूप धारण केल्यामुळे आपल्याला सत्य बदलणारं, साखळी प्रमाणे, गुंतलेले आणि "एका वेळेला एकच" या पद्धतीने दिसतं आणि अनेकपणा, विघटित वावर आणि संबंध जाणिवेत येतात. जे दाखवते आणि पुसून टाकते - हे दिव्य कार्य आहे. ते न स्वीकारल्यामुळे आपण बेचैन होतो आणि असुरक्षित वाटून घेतो. तसे वाटून घेण्याची गरज नाही. भगवंताचे नामस्मरण केल्याने आतून मनोरचनेची धारणा बदलू पाहते आणि त्यामुळे सत्य उमगते.
प्रेम सर्व अस्तित्वाच्या रुपांवर करावे. हे नको, ते हवे, किंव्हा हे करू ते करू, हे असे ते तसे - त्यातून समाधान नाही. प्रेम करणे शिकायला लागते. तो भाव प्रकट करायला लागतो. उपजत भाव अस्तित्वाचा असतो, पण सत्य माहीत नसल्यामुळे आपण भरकटतो. प्रेमाने, नामस्मरणाने आपण शांत होतो.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home