श्री
श्री
अस्तित्वाचा एक गुण म्हणजे *मन* निर्माण करणे. मनाचा स्वभाव असा की ते कशाला तरी धरून ठेवते आणि त्या भोवती सारे अर्थ निर्माण करते. त्यातूनच आपली वृत्ती, स्वभाव, गुण - अगुण, इच्छा, आकांक्षा, सुख - दुःख हे सारे संकल्पना होतात ज्याला आपण धरून राहतो. साऱ्यांचा मूळ स्पंदनेतून आहे आणि जसे ते होत राहते, तसे आपण होतो, स्वभाव बनतो, रूप धारण करतो.
सांगण्याचे तात्पर्य हे, की त्यामुळे नेहमीच तत्पूर्तेपण किंव्हा अपुरेपण पदरी पडते - कारण जो पकडला आहे तो एक मर्यादित आणि परावलंबी असलेला _धागा_ आहे, ज्यावरून इतर सारे गोष्टी "वेगळ्या" भासत राहतात. तो पकडलेला धागा कायम राहण्यासाठी इतर परिस्थिती तशीच राहायला हवी, अशी अपेक्षा आपण बाळगतो आणि आटापिटा करत राहतो! त्याने त्रास आणि चिंता निर्माण होते.
वरील प्रकरण महत्वाचे आहे, कारण त्यातून हे दिसून येते की "मी" कुठल्यातरी विषयाला, चक्राला, क्रियेला, वृत्तीला, आकाराला, संकल्पनेला _चिकटून_ राहणार, मग कोणी काहीही म्हणो! म्हणजे तसं बघितलं तर आपण फक्त स्वतःसाठी जगतो! कुठल्याही एका धाग्याला पकडणे म्हणजे "स्वार्थी आणि अहंकारी" असणे, असे संबोधित केले आहे. तो गुण धर्म आहे, त्या शिवाय जगाच्या अनुभवाचे महत्व कसे मिळणार?!
दुसरी गोष्ट अशी, की पकडणे बऱ्याच स्थितीत असते, म्हणून आपण बाहेरील वस्तू (दृश्यात दिसणारी वस्तू) जरी सोडली, तरी आतील त्या वस्तूचे स्पंदने कदाचित सोडलेही नसतील! म्हणून त्या स्पंदनातून परत परत त्याच प्रकारचे वस्तू किंव्हा परिस्थिती उद्भवत राहील! याचा अर्थ असा की जो पर्यंत आपण वृत्ती सोडत नाही, तो पर्यंत दृश्याचे अनुभव येणार.
धरण्याची ओढ गूढ आहे, वरवरची नाही. ती ओढ भगवताकडून येते, म्हणून तो गुण आपल्याला दिला आहे. आता प्रश्न असा आहे, की कुठल्या तत्वाला मग धरून ठेवायला हवे? अश्या तत्वाला की ते कायम, शाश्वत, शांत, स्वावलंबी असेल. ती म्हणजे शुध्द शक्ती, जी कायमच आहे - प्रत्यक्ष भगवंत आहे. म्हणून नाम साधना करावी, म्हणजे त्याला धरून आपले सारे वृत्ती शांत होऊ पाहतात आणि जे राहते ते म्हणजे फक्त अविनाशी तत्व.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home