Sunday, December 22, 2024

श्री

श्री 


विचार शांत करायला लागतात - याचा अर्थ असा की त्यांच्या पलीकडील क्रिया जाणून घेण्याचे सामर्थ्य संपादन करणे आणि त्या क्रियांना स्वीकारणे. म्हणजे विचार का उद्भवतात, त्याची चिंता न करणे आणि विचारांच्या स्वभावावर अवलंबून न राहणे स्वस्थ राहण्यासाठी. 

स्वस्थ आणि शांत हा सूक्ष्म स्थितीतील भाव आहे, ज्याच्यातुन विचार स्थिती उद्भवते. प्रत्येक स्थितीचा परिणाम असतो, ज्यावरून स्मरण होते. विचार तात्पुरतेपण, अपूर्ण अशी भावना जागृत करतात किंव्हा त्या पद्धतीची जाणीव ठेवतात. कुठलीही अस्तित्वाची स्थिती वृत्ती, विचार, भावना - यांचा समावेश असतो, किंबहुना त्या पद्धतीने साकार होऊ पाहते. म्हणून त्या स्थितीच्या _पलीकडे_ होणे हे सर्वांगीण चिंतन करण्याचा विषय आहे, जो फक्त बुद्धीच्या तर्काने होत नाही. म्हणून शरण जाणे आवश्यक ठरते. त्यालाच गूढता म्हणत असावे आणि त्यालाच "मला काहीही माहीत नाही" किंव्हा " भगवंताची इच्छा " म्हणत असावे. 

शांत होऊ पाहणे म्हणजे पळवाट नाही किंव्हा कोडे सोडवणे असाही नाही. विचारांच्या भाषेत विचार सोडवणे अशक्य. त्याला श्रद्धा वाढवणे जरुरी आहे. त्यासाठी नामस्मरण.

हरि ओम.


श्री 

भगवंतावर श्रद्धा म्हणजे परिस्थिती, जी विचारांच्या बळावर जाणिवेत येऊ पाहते, त्याच्याही पलीकडे घडामोडींवर स्वस्थता राहू देणे. म्हणजे फक्त विचारांवर ध्यान मर्यादित न राहू देणे आणि विचार जरी काहीही म्हणत असतील किंव्हा जाणिवेत आणत असतील, तरी त्याने बेचैन न होऊ देणे आणि त्यावर उगाचच पटकन प्रतिक्रिया न देणे - म्हणजे वृत्तीला प्रतिसाद न देणे. थोडक्यात मी ची व्याख्या अधिकाधिक सूक्ष्म करत राहणे, म्हणजे स्वार्थीपणा कमी करणे, अहं भाव नमवणे. 

याने काय होते की विचार नंतर उमटत नाही, किंव्हा विचारांची गरज राहत नाही. आणि याने शांतता लाभते.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home