Tuesday, December 31, 2024

श्री

 श्री 


मूळ जे असेल तो भगवत भाव आहे. भाव खटाटोप करून किंव्हा जर - तर ह्या अपेक्षातून करायचा नसतो. कुठलीही संकल्पना, इच्छा, भावना, स्तर, स्थिती, रूप बहिर्मुख असते. त्याच्यातून शुध्द भगवंत कळणे ह्याला प्रयास लागतात आणि सर्वांगीण चिंतन लागतं. 

तरीही भगवत भाव म्हणजे शांती - प्रेम प्रकट होऊ देणे, तसे संबंध करणे, विषय सोडणे, क्रियांवर श्रद्धा बाळगणे, अदृश्य ते दृश्याचा संबंध किंव्हा भाव स्वीकारणे. भाव म्हणजे अस्तित्वाची शुध्द शक्ती ओळखणे जी सर्व ठिकाणी वावरते, असते, क्रिया करते आणि सर्व घडामोडी तिच्यामुळे होतात. 

स्थिर ह्या विचाराला दोन भाग आहेत. कुठलीही वृत्ती उमटत नाही, हा सरळ अर्थ झाला. आणि सारे स्तर किंव्हा रूपं हे शांतीचे प्रतीक आहेत, हा भावही देखील स्थिर समजायला हरकत नाही. जे होते ते त्याच्या इच्छेमुळे, क्रियेमुळे होते - हे शांतीने स्वीकारणे. आपले येणे, वावरणे, चक्र जाणवणे, परिणाम भोगणे, विलीन होणे - हे त्याच्या इच्छेवरून घडते. पूर्ण त्याच्यावर श्रद्धा ठेवणे, म्हणजे कष्टी होऊ नये, कोडे सोडवण्याचा अट्टाहास धरू नये, त्रासून जाऊ नये. 

दृश्यात नाम घेत राहणे महत्त्वाचे आहे. त्यांनीच आठवण राहते, आणि त्यातूनच शांती भाव प्रकट होतो. तो कसा, त्याचे रूपं काय, संबंध काय, सूक्ष्म स्थिती म्हणजे काय ह्याची चिंता किंव्हा विचार करून त्याचा गुंता करून घेऊ नये. 

वास्तूकलेत बाहेरील रूप हे आतल्या आकाशातून निर्माण होते. आतील आकाश म्हणजे मनाच्या आतील आकाश. म्हणून बाहेरील रूप ह्याला दोरी म्हणजे मनात कसले वृत्ती येत आहेत, हे ध्यानात ठेवणे. सर्व अनंत संकल्पनेचे बीज मनात असते आणि तिथूनच प्रकट होऊ पाहते. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home