श्री
श्री
आज मी एक लेख वाचला - *नाम* याचा अर्थ काय. अर्थात, हे माझे विचार नाहीत, ते श्री गोंदवलेकर महाराज यांनी मांडले आहेत, त्यातूनच आणखीन सूचित विचार मांडत आहोत.
रूप, दृश्य, आकार (म्हणजे बाहेरील बदलणारे आणि संबंधित राहणारे कवच) - यांना चालना किंव्हा उत्पत्ती देणारी शक्ती म्हणजे नाम/ भाव/ जाणीव/ क्रिया.
ती शक्ती असतेच ( _pattern_ of becoming) आणि ती कायम राहते आणि त्यातूनच अनेक आकार आणि परिस्थिती येऊ पाहतात. म्हणून आकार तात्पुरता आहे, त्याला निर्माण करणारी आतील शक्ती विशाल, सूक्ष्म, स्वावलंबी आणि स्थिर असते. कैक लोक, आकार, रूपे, स्थिती आल्या आणि गेल्या - तरीही त्यांना साखळीत ओवून ठेवणारी शक्ती म्हणजे *नाम*. (Phenomenological reality).
दर रोजच्या जीवनात, इतिहास आणि भविष्य असेलही आणि त्यांचे स्थान असेलही. तरीही त्यांना प्रकट करणारी शक्ती एकच आहे आणि ती स्थळ + काळाच्या पलीकडे आहे, स्थिर आहे, कायम आहे, आनंदी आहे, सूक्ष्म आहे. ती आकाराच्या आत असते आणि तिला बघायला वेगळे डोळे लागतात.
व्यवहारात, कार्यात, कलेत, अभ्यासात अशी शिकवण आपण देऊ शकतो का? भरभराटीच्या युगात आणि असंख्य बदलांच्या दुनियेत - हे सत्य आपण ओळखू शकू का आणि विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करू शकू का - हा मुळातला प्रश्न आहे. काय शिकवावं आणि कसे - हे नंतरचे ओघाने आलेले प्रश्न आहेत. मूळ प्रश्न काय असावा हे पहिले पक्के ओळखणे आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन करावे, असे मला वाटते. अर्थात त्यात भीती किंव्हा अहं भाव का असतो, हे ही समजून घेणे - त्याला झाकून टाकणे म्हणजे वेडेपणा ठरू शकेल.
म्हणून जेवढे आपण स्वतःच्या आत जाऊ (अंतर्मुख) तेवढे आपल्याला त्या शक्तीची प्रचिती येते - तशे आपणही त्यात विलीन होतो. म्हणून बाहेरची _खेच_ नमवणे गरजेचे आहे.
त्यासाठी नामस्मरण.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home