श्री
श्री
असंख्य क्रिया सर्व स्तरात एकाच वेळेला होत राहणे आणि त्यावरून अनंत भाव, जीव, रूप, आकार निर्माण करत राहणे, त्यांना गुंतून ठेवणे आणि अनुभव निर्माण करणे - ही भगवंताची शक्ती आहे. ती शक्ती भगवंताच्या अस्तित्वामुळे प्रकट होते, विघटित होते, कार्यात राहते, संबंध निर्माण करते, भाव चक्र निर्माण करते आणि अनुभव देते.
हे प्रकरण विलक्षण आहे आणि त्यांचा परिणाम स्पंदनेपासून ते विचार चक्र ते आकार असा प्रकट होतो किंव्हा अस्तित्वात येतो. आपण हेतू - हेतू म्हणून धडपडत राहतो, पण हे विसरतो की हेतू संकल्पना ही निर्माण झालेली आहे भगवतामुळे. स्वतःच मूळ शोधायचं असेल किंव्हा जाणून घ्यायचं असेल, तर ते मूळ भगवंत आहे. मूळ ही गोष्ट सुरुवात नाही - ती "आहेच" किंव्हा "असते" असे ओळखणे, म्हणून त्या असण्याला काही हेतू नाही. म्हणजेच ती स्थिती स्थिर आणि कायम आहे आणि शांत आहे.
आपण खूपच वृत्तीला धरून ठेवत असतो - वृत्ती प्रकट करत राहतो, म्हणजे वासना तशे निर्माण होऊ देतो, म्हणजेच काहीतरी वासनांना प्रकट व्हायला कारण होते. हे कारण गहन आहे, आणि खूप काळापासून त्याला भट्टी मिळत आहे. त्या भट्टीचे कारण जरी शब्दात मांडू पाहिले तरी ते समाधान देईल असे नाही, किंव्हा त्याने मार्ग सापडेल असे नाही, किंव्हा त्यातून त्याचे उत्तर मिळेल असे नाही, किंव्हा त्यातून पुर्णतः स्थिती प्राप्त होईल असे नाही.
भट्टी जी निर्माण झाली आहे - मग त्याचे कारण कोणतेही असो आणि कोणीही करो - ती शांत व्हायला हवी. जर भट्टी निर्माण व्हायला कारण नसेल किंवा हेतू नसेल, तर शांत होण्यासाठी कारण का हवे? म्हणजे शांती रस कारणांच्या पलीकडे असते - कारणांवर अवलंबून नाही, जर - तर वर निर्भर नाही, कृतीवर अवलंबून नाही, उत्तरांवर निर्धारित नाही, व्याख्यांवर आणि स्पष्टीकरण देऊन सापडत नाही, माझ्यावर निर्भर नाही - म्हणजेच की ते असतेच आणि ती नैसर्गिक अस्तित्वाची अवस्था आहे. म्हणून सर्व बाजूला सारून, काय वाटते त्यावर काही लक्ष न देता, नामस्मरण करावे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home