श्री
श्री
अस्तीत्व भाव शक्तीमुळे येतो आणि शक्तीचे असणे म्हणजे सतत क्रिया करत राहणे. म्हणजे शक्तीला जाणीव असते आणि क्रिया असते आणि त्यामुळे अनुभव निर्माण होतो.
त्या क्रियेमुळे बऱ्याच स्थिती निर्माण होऊ पाहतात आणि "मी" चे संकल्पना निर्माण करतात - त्याला कर्तेपण म्हणू. म्हणजे "मी" देखील एक संकल्पना आहे शक्तीमुळे आलेली ज्याच्यामुळे कर्तेपण माझ्याकडे ओढून घेतो किंव्हा समजुतीमुळे रुपावर चिकटून राहतो किंव्हा ते रूप/ चक्र/ अनुभव/ परिणाम प्रकट करत राहतो आणि त्या पद्धतीने "दर्शन" घेत राहतो.
हे चक्र किंव्हा होणे, वावरणे, जाणे - गूढ आहे. त्या निर्मितीचा हेतू बुद्धीच्या भाषेत नसतो म्हणून बुद्धीला भीती वाटते. ह्याचाच अर्थ की आपली श्रद्धा शक्तीवर कमी पडते. म्हणून आपण सतत बुद्धीच्या भाषेत वावरतो आणि खटपटीत राहतो. स्वस्थता मिळणे कठीण ह्या प्रकारे जगलो तर! बुद्धीने दाखवलेला अस्तित्वाचा आकार किंव्हा रूप खरे नाही (किंव्हा संपूर्ण सत्य नाही). म्हणून बुद्धीने केलेले तर्क वितर्क सुद्धा अपुरे आणि तात्पुरते आहेत आणि त्यावरून आपली स्वतःची व्याख्या आणि गरज पूर्णपणे ठरवू नये. मी दृष्यावरून ठरतं नाही. मी फक्त एका भगवंताचा आहे आणि तोच खरा आहे. असा भाव खोलवर प्रकट होऊ द्यायला लागतो.
संकल्पना बुद्धी करते. भाव जाणिवेचा असतो. भाव सत्यता दर्शवते आणि त्यातील एक स्थिती आहे संकल्पना. म्हणून संकल्पनेला शांत होऊ देणे गरजेचे असते म्हणजे शुध्द भावाची प्रचिती येते.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home