श्री
*मी* हा भाव खूप खोलवर स्पंदनातून आणि त्यावरून साखळीतून निर्माण होतो आणि
इतर शक्तिरुपंबरोबर गुंतून राहतो/ संबंधित असतो. त्यातून मन गुंतून राहणे आणि
दृश्यात वावरणे असे परिणाम होतात. म्हणून त्याला बीज आणि झाड ह्याची उपमा दिली
आहे. कुठल्याही बिजेचं झाड होत आणि त्याचे फळे भोगायला लागतात. त्याला _साखळी_ म्हणतो किंव्हा _परिणाम_.
म्हणून
मूळ शक्तितून सर्व काही घडतं हे ध्यानात राहू द्यावे. तसच, त्यात वासना
मिसळली तर त्या साखळीतून देहबुद्धी झाली आणि दृश्य भावाचे संस्कार रोवले गेले आत.
हा
प्रकार कसा असतो, हे शांतपणे, प्रतिक्रिया न देता बघायला लागते.
म्हणजेच विचार "कुठून" प्रकट होतात आणि ते कसे विस्तार पावतात, हे ध्यानात येते. विचाराची मालमत्ता माझी नाही. विचारांना "मी" समजतो
ह्यातच माझी गफलत होते आणि त्या समजुतीने, तसा संबंध
ठेवल्यामुळे मला सुख - दुःख होते.
वरील
स्पष्टीकरण झाले. स्पष्टीकरण मार्ग दाखवतील, पण त्यातून जातांना अनेक वृत्ती उठतील
(अनेक अनुभव येऊ घालतील). त्यात शुध्द भाव प्रकट करणे किंव्हा नामावर प्रेम बसवत राहणे
- ह्याला प्रयास लागतात.
आपण ज्या
स्थितीत आहोत, त्यात बेचैन होऊ नये. ह्या तात्पुरत्या स्थिती मुळे स्थिरतेचा मार्ग
दिसणार आहे. स्थिती कशीही असू द्यावी - त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे. आपण
दृश्याच्या स्वभावसाठी नसतो. आपण भगवंताच्या शांतीसाठी आलो आहे - त्यात आपल्याला
विलीन व्हायचे आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home