Friday, January 03, 2025

श्री

 श्री 


मन विषय धरून ठेवते - ते धरणे आणि गोष्टींशी/ रूपाशी/ आकारांशी _संबंधित_ राहणे हे वासनेतून घडतं असते. ती वासना चक्र दर्शवते, गुंतून ठेवते, साखळी निर्माण करते आणि तसे परिणाम किंव्हा अनुभव किंव्हा स्मरण प्रकट करते. ह्याचा अर्थ आपल्यासाठी असा होतो की साखळी काय करावी किंव्हा वासना कुठले प्रकट करावे हे प्रयत्नाने आपण बदलू शकतो. म्हणून विचार, भावना, संबंध, कार्य, हेतू - ह्याला महत्व आहे, कारण हे घटक शक्तिरुप आहेत - म्हणजे त्यांचा परिणाम सर्व ठिकाणी होत असतो. 

वृत्ती स्वार्थी आहे, ह्याचा अर्थ असा की तिचे परिणाम आणि साखळी फक्त स्वतःच्या देहावर केंद्रित राहते.  स्वार्थीपणाचा अर्थ खोलवर असा की आपण स्वतःचा रूपाला चिकटून राहतो आणि ते शक्तिरूप जे काही दाखवेल त्याला आपण खरे मानतो. चिकटून राहणे ही क्रिया खूप गुंतलेली, खोल, घट्ट आहे म्हणून कुणी काहीही म्हणा, आपल्याला जे वाटतं तसंच आपण वागत राहतो आणि परिणाम भोगतो. हे होत राहणार. 

तरीही हे पचनी पडले की कुठे दुरुस्त करायला हवे हे कळून येते. आणि तो मार्ग पत्करला की हेच चिकटणे शिथिल होते. त्यातून शांती प्रकट होते.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home