Tuesday, December 31, 2024

श्री

 श्री 


अनुभव, दृश्य, जन्म, भाव हे ध्यानात येणे, त्यात भगवंताची इच्छा आहे. आपले होणे, येणे, वावरणे, विलीन होणे - हे त्याच्या संकल्पनेत असलेला मार्ग आहे. हे होत राहणार, आपण निर्माण होणार, भाव येणार, बदल असणार, अनेकात वावरणार, अस्थिर राहणार, शोध घेणार, सैय्यम ठेवणार, श्रद्धा वाढवणार - हे सगळं होणार. ते होणार. आज ना उद्या ते होणार.

चिंता करू नये. सर्व गोष्टींचे चक्र असते, लाटा असतात, जाळ असते, भरती आणि ओहोटी असते, उगवणे आणि मावळणे असते, चढ आणि उतार असते आणि ह्यालाच हालचाली म्हणायचे. हालचाली येणे आणि जाणे मधून भासते - ती रेश नसते! जर सर्वच तसे असेल तर आपलेही येणे आणि जाणे हे निश्चित आहे तर! म्हणजे अदृश्य - दृश्य हे असणारच आहे! 

आपण मग काम का करतो? वरच्या हालचाली ध्यानात येण्यासाठी. कार्य त्यासाठी असते; सिद्ध होण्यासाठी नाही. आकार दिसणे, प्रतिक्रिया मनात येणे, कृती करणे, विचार मांडणे, धावपळ करणे ह्या सर्वातून पलीकडे होणे आहे - त्यास _मुक्ती_ असे म्हणतात. तसा भाव जागृत होणे, हे स्वाभाविक गुण ओळखले जाते मानवाचे. त्याचे पाऊल खुणा मानव दृश्यात सोडतो. ते ओळखावे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home