Wednesday, January 29, 2025

श्री

 श्री 


जिवंतपणाचे रुप भगवत शक्ती मुळे प्रकट होते. त्यात अनेक क्रिया होऊन स्मरण शक्ती किंव्हा भाव तैय्यार होतो, ज्यामुळे शुध्द भगवत भाव "विसरायला" होत - इतकं एकनिष्ठ आपले मन दृष्याशि होते! म्हणजेच की मन हे कुठल्याही शक्तीचे संकल्पना निर्माण करू शकते आणि त्याचे परिणामही भोगते! ह्याला "चक्र" असे संबोधित केले आहे. साहजिकच, चक्राच्या आत शिरणे आणि बाहेर येणे (म्हणजे शांत होणे) संभव आहे. निर्मिती सुरू करून विस्तार पावणे जशी क्रिया आहे, तसेच शांत होऊन सगळीकडे सत्य, सूक्ष्म स्थितीत स्थिर होणे आहे. दोन्हीही आपणच करतो! दोन्हीही एकाच अस्तीत्व नाण्याचे दोन बाजू आहेत! Wave/ space _and_ particle/ form. दोन्हीत तेच अस्तीत्व वस्तू आहे, फक्त रूप निराळे आहे. वेगळेपणा भ्रम आहे परिणाम भोगण्याचा - तो सत्य नाही. नाण एकच आहे, ह्यासाठी आपण स्थिर व्यायला हवे. 

प्रपंच असतोच, आणि अनुभव आपल्या रूपाला साजेस तशे येतात. पण त्यात शुध्द भाव ओळखता आला पाहिजे. कुठल्याच बिंदुची, थेंबाची, रुपाची, संकल्पनांची, भावनेची चिंता करू नये - अजिबात नाही. सर्व भगवंत आहे, ह्यावर श्रद्धा भक्कम करणे. म्हणजे आपण स्वस्थ चित्त होतो. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home