श्री
श्री
शक्ती कुठलही रूप घरू शकते. तिच्यात स्तर, स्थिती, घटक, चक्र, गुंतागुंती, बदल, गती, गुण आणि भाव असतो - किंव्हा तसा तो *प्रकट* होतो. तिला स्वतःची जाणिव असते म्हणून तिने केलेले _आकार किंव्हा जीव_ (हे दोन्ही एकच आहे), जिवंत असतात आणि एका स्मृती मध्ये वावरत असतात. त्या स्मृतीतून संकल्पना, अर्थ, संबंध, दृश्याचे भासणे - अश्या गोष्टी अनुभवास येतात. एकंदरीत ह्या सर्व घडामोडींना _दैवी इच्छा किंव्हा दैवी संकल्पना_ (Divine Imagination) म्हणू. इथे "imagination" हा शब्द जिवंत रूप घेणे सत्यतून असा होतो. मूळ संकल्पना अर्थातच भगवंताची, जी आपण विसरतो, म्हणून दृश्य जग अनुभवतो.
ह्या साऱ्या घडामोडींमध्ये म्हणून शांत होणे आणि भगवंताचे कार्य ओळखणे हे आपल्या हिताचे ठरते. म्हणजे भगवंता पर्यंत पोचणे किंव्हा त्याचा अनुभव आत्मसात करणे.
सतत काहीतरी निर्माण करत राहण्याची वासना आपण बाळगतो, म्हणून दृश्य वस्तू किंव्हा आकार किंव्हा रूप निर्माण करतो. त्या क्रियेचा _परिणाम_ आहे, त्या क्रियेचे _संस्कार_ आहेत. त्याने भाव होतो, जो तात्पुर्तेपण आणि वेगळेपण भासून देतो आणि त्याला आपण धरून ठेवतो. _असुरक्षितता_. जो पर्यंत ही खोल भावना असते ध्यानात, तो पर्यंत स्वस्थता येणे कठीण. म्हणजे स्वस्थ होणे ह्यात मनोरचनेचे प्रयत्न आहेत - त्यात दुसरा कुणी काहीही मदत करू शकत नाही.
म्हणून नामस्मरण.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home