श्री
श्री
असणे हा भाव आहे. त्यातून क्रिया घडते, जिच्यामुळे अनंत स्तर, स्थिती, चक्र, संबंध, विचार, भावना, आकार अनुभवात प्रकट होतात आणि ज्याच्यात "मी" हा भाव होऊन गुंतून राहतो. त्याला संस्कार, वावर, तादात्म्य, प्रेम, खरे वाटणे, असे निरनिराळे शब्द आहेत. म्हणजेच की कुठल्याही गोष्टीला आपण खरे करू शकतो. _करणे_ हे तेव्हा साध्य होत, जेव्हा आपण त्यात गुंतून राहतो आणि त्या क्रियेत मिसळतो किंवा संबंधित राहतो. त्याला "हेतू" असे ही म्हणू शकू. हेतू निर्माण होणे हे अस्तित्व शक्तीमुळे साकार होत राहते आणि एकदा हेतू निर्माण झाला, की दृश्य जग आपल्या समोर निर्माण झाले! ह्याला एकंदरीत "भाव" असा शब्दाचा वापर आहे.
अस्तित्वात असणे, म्हणजे भाव साकार होणे. किंव्हा जे काही आपण उपभोगतो, ते सर्व एक भाव संपादन केल्यामुळे आहे. त्यास गुंतून राहणे किंव्हा चिकटून राहणे असे ही म्हणतात.
प्रश्न असा आहे की आपण कुठे गुंतून राहतो आणि का?! गुंतून राहण्याची वृत्ती का निर्माण होते?!
वरील प्रश्न गूढ आहे. भगवंताची इच्छा मानल्याने, त्या इच्छेची एक छटा ही की गुंतून राहणे भाग आहे आपल्यासाठी. म्हणजे हालचाली जाणवणे आणि ते मनात येणे, हे देखील ओघाने आले. आणि त्याला प्रतिक्रिया देणे हे ही आले!
ह्या सर्व क्रियेत शांतीने राहण्यासाठी नामस्मरण करत राहणे हे संतांचे म्हणणे आहे. त्याला प्रमाण मानून तसे करणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home