श्री
श्री
वस्तू होणे, आकारास येणे आणि दृश्यात जाणे हे शक्तीचे कार्य आहे म्हणजेच की ते शक्तीच्या अस्तित्व किंव्हा असण्याचा गुण धर्म आहे. आकार हे प्राणाकडून होते, आणि प्राण हे वासनेतून आणि वासना शक्तीतून निर्माण होते. त्या होण्याच्या क्रियेत _भाव असतो_, म्हणून कुठलीही गोष्ट हेतू शिवाय, जाणिवे शिवाय आणि अनुभवे शिवाय निर्माण होत नाही. एकंदरीत ह्याला "भाव" म्हणतात.
क्रियेच्या दृष्टीने भावाला स्तर, स्थिती, चक्र, प्रक्रिया, गुण, गती, गुंतून राहणे अशा साऱ्या घटकांनी स्पष्टीकरण देऊ शकतो - ते फक्त समजून घेणे आहे किंव्हा सांगणे आहे, दुसरा तिसरा हेतू असू नये.
म्हणून क्रिया का होतात, ह्याने जीवाचा भाव ठरू नये - ते होणार असे स्वीकारावे. गोष्टी होणे आणि विलीन होणे ह्यातून आपण ठरत नाही. आपण होणे हे त्या प्रक्रियेतून आलेली छटा आहे, रंग आहे. रंगानी मी ठरतं नाही, सिद्ध होत नाही, त्यात समावेश होत नाही, त्यात पूर्ण असत नाही. हे आत्मसात होऊ देणे.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home