श्री
श्री
गोष्टींना अंत नसतो - तो खेळ शक्तीचा जन्मो जन्मीचा आहे. म्हणजे सुरुवात किंव्हा शेवट, ह्या संकल्पनेतून हेतू ठरवू नये, कार्य करू नये. म्हणजे स्थिर राहावे कुठल्याही "स्थिती" किंव्हा "प्रसंगात". म्हणजेच की प्रसंगाला कुठलेही हेतू किंव्हा पूर्वीचे कार्य ह्याने अर्थ लावू नये - तसे ते नसतात आणि सर्व भगवंताकडून आलेले असतात हे ओळखणे, म्हणजेच शांत राहणे, उत्तेजीत होऊ नये किंव्हा गुंतून राहू नये, परिणाम करून घेऊ नये.
भगवंताच्या अस्तित्वाला आणि त्यातून होणाऱ्या क्रियांना हेतू नसतो - फक्त शांत भाव असतो. हेतू मी निर्माण करतो माझ्या भावातून आणि तसे परिणाम मी भोगतो. म्हणून माझा हेतू भगवंताशी समरस होऊ देणे, हे माझ्या हिताचे ठरेल, कारण त्यातूनच मी शांती अनुभविन.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home