Thursday, February 20, 2025

श्री

 श्री 


मी म्हणजे साखळी नाही. भाव स्थिर होऊ देणे किंव्हा शांत होऊ देणे म्हणजे साखळीशी स्वतःचा अर्थ जोडू नये. तरीही ती बौद्धिक क्रिया नाही, की एखाद कोड मांडू शकलो की ते सोडवण्यासाठी त्याचा धावा घ्यावा! उलट परिस्थिती आणखीनच बिघडेल! 

लक्षात हे येऊ देणे की भाव आहे अस्तित्व. आपण जो काही भाव प्रज्वलित ठेवू, त्यातूनच दृश्याचे अनुभव येणार आहेत. पहिले भाव, मग त्यातून आपोआप होणाऱ्या साऱ्या क्रिया....कारण भाव असणे ह्याच तात्पर्य म्हणजे क्रियेत वावरणे! म्हणून इतर कुठल्याही घटक ह्यांच्या बद्दल विचार न करता सरळ भावाकडे लक्ष केंद्रित होऊ देणे. 

एकदा भाव पक्का केला, की त्याप्रमाणे सर्व चक्र प्रकट होतील. म्हणून भगवत भाव प्रकट करावे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home