श्री
श्री
विचार आणि त्याचे चिंतन करणे महत्वाचे आहे. जाणिवेचे स्थान असते, ते शक्तीचे एक गुण आहे. म्हणून अस्तित्वात जाणीव, अनुभव, क्रिया,परिणाम, भाव, रूप, वस्तू हे राहणार.
रूप किंव्हा आकार होत राहणे ही क्रिया आहे अस्तित्वाची, _तात्पुरती_ किंव्हा ज्याला मी "ठेहेराव" म्हणीन. तसे आहे, म्हणून ती स्थळ, काळ, क्रियाच्या चौकटीत वावरत असते, तसे गुण घेऊन झालेली असते. म्हणून असे होत राहणार, रूप आणि आकाराच्या बाबतीत.
सर्व थांबण्याचा क्रियेला चालना भगवंत देतो, त्याची शक्ती देते, ती दृश्यात दिसते/ भासते. म्हणून ती शक्तीच ठरवते की कधी, कुठे एखादे रूप दाखवायचे आणि विलीन करायचे. हे शक्तीचे कार्य आहे.
आपण त्या शक्तीतूनच आलो असल्यामुळे, आपण हे कार्य स्वीकारले, तर शांत होऊ. भगवंताचे अस्तित्व प्रचितीस येणे, म्हणजे शांत होणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home