श्री
श्री
जाणीव ही अनेक क्रियेतून रूपात दिसून येते किंव्हा प्रकट होते. प्रकट होण्याला हेतू नसावा. जर जाणीव असण्याला आणि त्याचे परिणाम व्हायला हेतू नाही (स्वतः सिद्ध असल्यामुळे) तर त्यातून सर्व साखळी निर्माण व्हायला दृश्य व्हायला, त्या दृश्याशी संबंध होण्यालाही हेतू कसा असेल?!!
इथे समजणे आहे की स्वतः सिद्ध म्हणजे _असणे_, असण्याला कारण लागत नसणे, आणि त्यावरून होणाऱ्या क्रिया होत राहणे आणि त्या क्रियेतून अनेक रूप आणि आकार प्रत्ययास येत राहणे. दुसरा शब्द आहे ह्याला "प्रकृती".
वेगळ्या अर्थाने मांडायचे झाले तर _हेतू_ रूप आणि आकार निर्माण करते आणि जो पर्यंत हेतू टिकून असते, तो पर्यंत दृश्याशी संबंध होत राहणे आले. म्हणजे हेतू होणे असण्यातून आणि क्रियेतून होणारे प्रकरण ओळखायला हवे. असणे आहे, म्हणून त्यातून _हेतू होणे आले_. तसे पहिले तर असणे हेतूच्या अगोदर येते! किंव्हा असण्याला काही हेतू लागत नाही! म्हणजे आपण हेतूचा रंग कसाही घालू शकतो! हेतू दगडासारखे कडक समजण्यापेक्षा लवचिक, निर्माण होऊ शकते, असे ओळखायला हवे. आपल्या अस्तित्वाला (जीवाच्या) हेतू लागतो. हेतू नाहीसा झाला किंव्हा शांत झाला, की आपणही भगवत स्वरूप होतो.
आपल्या रूपास आणि शुद्ध अस्तित्वाला जोडणारा दुवा म्हणजे हेतू. हेतू एक विलक्षण चक्र, क्रिया, साखळी, परिणाम, संकल्पना, भाव दर्शवते! हेतू फक्त बौद्धिक न राहता, सर्वांगीण स्तरावर पसरतो किंव्हा कार्य करतो म्हणून हेतूचे पाया मुळे खूप खोल असतात, ते दृश्यात दिसत नाही, ते सूक्ष्म स्तरातून प्रकट होत राहतात. दृश्य तर त्या हेतूचे बाहेरील टोक आहे, ज्याची सुरुवात किंव्हा लगाम भगवंताच्या हातात असते! प्रत्येक खोल स्तरात जाताना, हेतूची _क्रिया_ बदलत राहते (म्हणजे प्रभाव, कार्य, संबंध, भाव, अनुभव वगैरे) म्हणून प्रत्येक आतील टप्प्यात शिरताना बाहेरचे सर्व संबंध सोडायला लागतात. परत संबंध हा सरळ अर्थ घेण्यापेक्षा, सर्वांगीण गूढ क्रिया आहे, हे ओळखणे.
हे ओळखण्यासाठी आणि तसा अनुभव घेण्यासाठी नामस्मरण करत राहणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home