Sunday, May 11, 2025

श्री

 श्री 


दृश्य जगाचा अनुभव स्मरणात आणणे, ही भगवंताची इच्छा आहे. म्हणून ते स्वीकारावे शुद्धतेने.

त्या अनुभवात अनंत हालचाली, गोष्टी, पदार्थ, गुंतागुंती, आकार, गुण, रूप, परिणाम जाणवत राहतात. त्यामुळे आपली स्वतःची जाणीव आणि जगाची जाणीव प्रज्वलित होत राहते. जसा मी आहे,तसे बाकी सारे आकार आहेत. अनुभवाचे रूप जसे मी भोगतो, तसे सर्व भोगतात. वेगळेपण, तात्पुरतेपण हा देखील जगाचा गुण आहे आणि त्यातून येणारे संबंध. 

इथून प्रवासाला सुरुवात आहे. तो प्रवास अनेक जन्मांचाही असावा, कुणास ठाऊक?! प्रवासाचे कारण भगवंत आहे आणि शेवट तोच आहे. म्हणून तिथ पर्यंत जाणे आहे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home