श्री
श्री
अस्तित्व गोल असते आणि मोकळं असते - त्यात आकाश आणि क्रिया ह्याचे समावेश असते. फक्त आकाश नाही, आणि फक्त क्रिया आणि त्यातून होणारे आकार नाही. दोन्ही असण्याला अस्तित्वाचे गुण, जिवंतपणा किंव्हा श्वास किंवा इच्छा म्हणावे. हे दोन्ही गोष्टी आपल्या अनुभवात येतात, आपण ह्या दोन्ही गोष्टींचे आहोत. बदलांच्या _मध्ये_ आकाशाचे अंश तर असतेच आणि जसे अंतर्मुख होत जाऊ, तसे आकाशाचे प्रमाण वाढते आणि बदलांचे किंव्हा आकारांचे कमी होत जाते. ह्याचा कदाचित अर्थ असा असावा की जे आपल्याला आकार वाटायचे पूर्वी, ते अंतर्मुख होताना विरघळून आकाशात त्यांचे रूपांतर होते! म्हणजे आकाश सगळ्या वासना ह्यांना, वृत्तीना, साखळीला, संबंधांना, रूपांना, आकारा ह्यांना, *समावते*. सगळ्या गोष्टी आकाशात (भगवंतात, आत्म्यात, शक्तित, सूक्ष्मात, अदृश्यात) *विलीन* होतात. म्हणून आकाशाला "सत्य" ही उपमा दिलेली आहे, त्यात दुसऱ्या कुठलाच अनुभवाच शिरकाव होत नाही, निर्मिती होण्याचे कारण असत नाही.
दररोजच्या दृश्य जगातून आपल्याला सुरुवात करायला लागते. जे काहीही असो, कुठूनही आलेले असो, कसेही असो, कुठेही जाणार असो, कसलेही हालचाली असो, ते पूर्णतः स्वीकारावे, ही पहिली पायरी. गोष्टी येण्यात, होण्यात, वावरण्यात, बदलण्यात, जाण्यात - ह्यात शक्तीचा (आकाशाचा) हातभार असतो. आकाशाचे स्रोत आपल्यातही असते, त्याचे चिंतन करत आत्मसात करायला लागते. त्याचा अनुभव हा आपल्याला सर्वव्यापी करतो, शुद्ध करतो, स्थिर करतो, मोकळे करतो. हीच ती नामसाधना.
सर्व गोष्टींचे कारण, संबंध - ह्याचे बीज आपल्यात असते. ते ओळखावे आणि त्यास शुद्ध करावे. त्याची सतत आठवण आणि संस्कार आत पर्यंत होण्यासाठी नामस्मरण करावे.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home