श्री
श्री
समाधान म्हणजे दिलेल्या परिस्थितीत शांत वाटणे. परिस्थितीत वावरत असताना, शांती पूर्ण टिकून राहणे. म्हणजे निरहेतू कर्म करत राहणे, सर्व देणे, अपेक्षा न ठेवणे, शुद्ध होत जाणे, श्रद्धा वाढवणे, सूक्ष्म होणे, रूप जसे असेल किंव्हा अनुभव/ संबंध कसेही आले, त्यांनी व्याकुळ न होणे, कालची आणि उद्याची चिंता न उद्भवणे वगैरे.
काल आणि उद्या किंव्हा स्थळ, काळ, क्षण, क्रिया हे शक्तीचे परिणाम आहेत, ज्यावरून भाव आणि संकल्पना होते, चक्र होतं आणि विषय तैय्यार होतो. रूप, साखळी, बदल, गुंतागुंती, संकल्पनांचे स्वरूप, निर्मिती क्रिया आपल्या हातात नसते - ती दैवी उद्भवत असते. म्हणून दृश्याचे असणे, होणे, वावरणे आणि बदल होणे हे भगवंत ठरवतो.
आपल्याला शांतीने संबंध ठेवायला लागतात अस्तित्व जाणून घेण्यात. त्या मार्गावर असणे. मार्गावर चालत राहणे आणि तो मार्ग का आहे, हे जाणून घेणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home