Thursday, May 15, 2025

श्री

 श्री 


अस्तित्वात असणे ह्याचे बरेच अर्थ निघतात, आणि ते जाणवणे म्हणजे आपला प्रवास होतो. 

जीव हे _शक्ती चक्र_ आहे. चक्र म्हणजे क्रियेच एक स्वरूप. त्या स्वरूपात साखळी, घटक, स्तर, भाव, विषय, मन, गुंतणे, परावलंबन, जाणीव, विचार, भावना, परिणाम, भोग, वासना असे अनेक घटक ध्यानी वावरत असतात. त्याचे वर्णन सूक्ष्मापासून ते स्थूल पर्यंत होत असतात, किंव्हा ध्यानी येतात आणि ते सांगत असताना त्या होण्याची रचना काय किंव्हा विश्लेषण काय, हे शब्दात मांडू शकतो आपण. आध्यात्मिक पद्धतीने आपले आणि अध्यात्माचे नाते काय, म्हणजे वरील वर्णन जाणून घेणे.

विचारांच्या बळावर समजून घेत राहताना सर्वांगीण चिंतन चालू ठेवायला लागते आणि त्या संकल्पनांचे _अनुभव_ घ्यायला लागते. परत, वरील क्रिया ही अनुभव देते. सध्या अनुभव आणि मी ह्याला वेगळे आपण मानत नाही, म्हणून प्रवास जो म्हणायचा तो म्हणजे अनुभव शुद्ध होत त्याचा परिणाम कसा कमी होईल (कष्टी न बनवेल) हे जाणून घेणे. 

वरील दोन्ही गोष्टी दररोजच्या प्रपंचावरून करत राहायला लागतात. प्रपंच हा झालेला संबंध अस्तित्वाशी, किंव्हा एका स्थितीत गुंतून राहण्याची क्रिया आहे. त्या गुंतण्यामुळे एका प्रकारचे अनुभव, जाणीव, क्रिया, परिणाम होत राहते. ते मनाला घट्ट चिकटून राहते आणि त्याचे संस्कार होत राहतात किंव्हा स्मरण राहते. त्यास आपण भोग म्हणतो. 

आपला प्रवास प्रपंचशी संबंधातून आहे. प्रपंच सर्वांना आहे आणि त्यात बदल, हालचाली, गती असे अनेक गोष्टी येत राहणार आणि निघून जाणार. त्यातच आपल्याला शांती भाव आत्मसात करायचा आहे, म्हणजे सर्व एकच आहे, अशी जाणीव होणे आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home