Saturday, June 14, 2025

श्री

 श्री 


बोलण्यातून आपण उगाचच विघटित कार्यात गुंतून राहतो, म्हणजे स्वतःचे स्पष्टीकरण देण्यात गुंग होतो! कितीही केलं, बोललो, सांगितलं तरी पूर्ण समाधान त्यात नाही कुणालाही. बारकाईने परिस्थितीतील घटक सांगून आणि उलगडा करून समाधान असते का हे ओळखावे. तसे न केल्याने जे होण्याचे आहे, ते थांबते का? तात्पर्य माझ्यावर काही अवलंबून नसतं. आणि मी म्हणेन तसे काही होईल असे काही नाही. म्हणजे अशी परिस्थिती नैसर्गिक मानायला हवी! 

अस्तित्व भाव, जो अत्यंत शुद्ध होऊ शकतो, तो कुणावर अवलंबून नसतो आणि तो नुसता असतो. म्हणजे तो दृश्यात दिसत नाही, त्याला बघायला आपण सूक्ष्म होणे आले आणि अंतर्मुख होणे आले. ते होताना श्रद्धा ठेवणे आहे, सैय्यम ठेवणे आहे आणि चिंतन करत राहणे आहे. 

सर्व अस्तित्वातील घडामोडी भगवंताच्या शक्तीचे परिणाम दर्शवतात - त्यावर पूर्ण श्रद्धा बसायला हवी. आपण त्याच्या इच्छेच्या बाहेर नसतोच म्हणून काहीही येत गेल, तरी त्याला _प्रसाद_ मानावे आणि ते स्वीकारावे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home