Friday, June 13, 2025

श्री

 श्री 


आपण एखाद्या _गोष्टीला_ कसे धरून राहतो, त्याचे स्मरण करतो, संबंध जोडतो, आकारात आणतो, भाव निर्माण करतो - हा प्रकार अत्यंत गूढ असतो आणि तसा त्याकडे बघावा आणि स्वीकारावा. गूढ म्हणजे भगवत इच्छेतून निर्माण होऊ पाहणारे, अस्तित्व शक्तीचे कार्य, क्रिया आणि परिणाम. गूढ म्हणजे स्थळाच्या आणि काळाच्या भाषेत तो प्रकार पूर्ण मांडता येत नाही. इच्छा कशी कार्य करते हे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. म्हणून सर्व घटकांचे मूळ भगवंताच्या अस्तित्वात असते, त्या गोष्टीला आपण निर्माण नाही करत. आपली निर्मितीही गूढ असते, वासनेतून होते आणि इतर गोष्टींशी _व्यवहार_ करते. म्हणजे _व्यवहार_ क्रियेचे मूळ देखील भगवंताच्या शक्तित आहे.

म्हणून घडामोडी सूक्ष्मातून होतात. ते होतातच. आपण काही बोललो नाही तरी आतील घडामोडींचे बीज पेरले जात असते आणि त्यामुळे आपल्याला परिस्थिती जाणवते. अंतर्मुख होऊन परिवर्तन होणे, ह्याला सैय्यम आणि श्रद्धेची जरुरी आहे. अंतर्मुख क्रिया सर्व रूपाच्या पलीकडे आहे, बुद्धीनेही ती पूर्ण कळणे अवघड. सूक्ष्म होणे ही स्थिर होणारी गोष्ट आहे, शांत होणे, सत्य जाणणे, असे निरनिराळी नावे आहेत. सूक्ष्माचा प्रवास प्रामुख्याने श्रद्धेने होतो मग इतर रूपाचा पाठिंबा लागतो. रूपांचे पर्यवसान शेवटी पूर्ण श्रद्धेत होणे गरजेचे आहे. 

भगवंत जाणण्याची गोष्ट आहे, पटवण्याची नाही किंव्हा हेतू ठेवून सापडवण्याची नाही किंव्हा मुद्दामून व्यवहारात आणण्याचीही नाही.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home