श्री
श्री
गोष्ट बदलत राहते. बदल, ह्याचा अर्थ की ती अस्तित्व शक्तीच्या क्रियेतून _निर्माण_ झाली आहे. निर्मिती होणे, हे देखील एक गूढ प्रकरण आहे ज्यात अनेक घटक, स्तर, सूक्ष्म स्थिती ते स्थूल साखळीचे घटक, संबंध, भाव, अनुभव, परिणाम, द्वैत प्रकरण, चक्र, स्मरण, रूप, आकार - हे सारे प्रकार अस्तित्वात _घडतात_. ह्या सर्वांना आपले मन गुंतून राहते, म्हणून मनाचाही उगम खूप गूढ क्रियेतून आणि सूक्ष्मातून झाला असतो. त्याला "भगवंताची इच्छा" असे सांगितले आहे.
मी कसा झालो, का झालो, काय भोग असतात, काय दिसून येतं, कसा वावरतो, कुठे जाणार, कधी जाणार - हे बौद्धिक तर्काच्या दृष्टीने कदाचित माहीत होणार नाही, तरीही शांती प्रकट होणे हे माझे ध्येय आहे - असे स्वतःच्या मनाला सारखे सांगत राहायला लागते.
गूढ, ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे सर्व विश्व शांतीतून आणि श्रद्धेतून आले आहे, त्याला व्ययक्तिक हेतू अजिबात नाही. "व्यक्ती" म्हणलं तर स्वतःचे रूप आणि आकार अपुरे/ तात्पुरते आहे; निर्मितीच्या क्रियेतून आले आहे आणि भगवत इच्छा दर्शवते. मग _निर्मिती असण्याचे_ सर्व गुण व्यक्ती मध्ये असणार! ह्याचा सरळ अर्थ हा की माझ्या अनुभवांचा सूत्रधार भगवंत आहे आणि म्हणून परिस्थितीतील सर्व घडामोडी त्याच्या इच्छेने आलेले आहेत आणि त्याच्या इच्छेने निघून जाणार आहेत. येणे, वावरणे आणि जाणे, हे त्याच्या शक्तीचे कार्य आहे, हे ध्यानात राहू देणे.
त्यासाठी नामस्मरण करत राहणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home