श्री
श्री
शक्तीचे कार्य म्हणजे असण्याचा परिणाम. जीव त्याला कार्य, किंव्हा निरहेतू, किंव्हा परिणाम, किंव्हा घटक असे शब्द लावतो समजून घेण्यासाठी. हे समजून घेणे स्वच्छ मनाने करावे, त्यातून काय मिळेल किंव्हा हेतू अधिक प्रबळ करणे असे विचार करू नये.
साहजिकच जीव झाल्यामुळे वासना, साखळी, चक्र, प्राण, आकार, दृश्य अश्या गोष्टी होत राहणार किंव्हा त्या प्रमाणे _स्मरण_ घडवणार. त्याने आपण तात्पुरते आहोत किंवा वेगळे आहोत असे भासणार, तसा भाव वावरणार. त्यामुळे खूप कृत्य करण्याची इच्छा होत राहणार. ह्यातून हे कळेल की कार्य कोणाचे आहे, तर एका शक्तीचे आहे! त्या शक्तीच्या असण्यामुळे ह्या सर्व वरील गोष्टी निर्माण होत राहतात, वावरत राहतात आणि बदल पावतात. म्हणजे आपण, आपली इच्छा, अट्टाहास, धडपड, परिणाम, शंका, हे शक्तीमुळे उदयास येते.
कितीही बारीक सारीक विचार करण्याचा प्रयत्न केला तरीही तात्पुरतेपण जात नाही, कारण त्याच्या पाठीमागे अहं भाव किंव्हा तात्पुरतेपण किंवा भीती असते.
त्यासाठी सर्व भाव शांत होऊ देणे, हे संतांचे सांगणे आहे. त्याची क्रिया आपल्यासाठी म्हणजे नामस्मरण.
हरि ओम.
श्री
दृश्यात वावरायला लागलो की भीतीतून, सिद्ध करण्यासाठी काहीतरी खटपट करत राहणे, हे जरुरी आहे का?!..
दृश्यात आलो, ह्याचा अर्थ क्रियेचा परिणाम झाल्यामुळे चक्र अनुभवात वावरत राहिले आणि त्याचा एक भाव प्रकट झाला. त्यात अनंत घटक, संबंध, साखळी आले. त्यात स्थळाची संकल्पना आणि काळाची आली. त्यात अनेक जन्मांचे कृती आल्या.
असो, हे माहित नाही की ह्याचे काय प्रयोजन असतं आणि त्यामुळे कुठला हेतू ठेवावा. म्हणजे आपण दृश्याशी निर्भर राहून चालेल का? असे आपण का करतो?
हे स्वीकारायला नामस्मरण.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home