श्री
श्री
रूप, आकार, दृश्य, अनुभव, प्रवाह, हालचाली, भाव - _ह्यांच्याशी आणि ह्यांच्या द्वारे संबंध_ अनेक प्रकारचे असू शकतात. म्हणजे *संबंध* ह्या संकल्पनेला दोन अर्थ आहेत - स्वतः शक्तीशी संबंध आणि शक्तीतून होऊ पाहणारे संबंध! आपले संबंध शक्तीशी शुद्ध झाले (व्ययक्तिक घेतले गेले नाही), तर त्याच्या क्रियेतून इतर होऊ पाहणारे रूप आणि आकारांशी संबंध देखील शुद्ध होतील! म्हणजे इथे अंतर्मुखपणा किंव्हा आत डोकावून मन स्वच्छ करणे हे अभिप्रेत आहे. जर मन मोकळे झाले तर त्या क्रियेतून होणाऱ्या गोष्टींशी आपला मनाचा संबंध मोकळा बनेल. म्हणून जो अभ्यास आहे तो मनाचा आहे, ते काय प्रकट करते आणि कसे प्रकट करते, ह्यावर केंद्रित आहे.
आतील भीती किंवा गोंधळ बोलून दाखवणे त्यासाठी महत्त्वाचं आहे - त्यातून मन मोकळं होतं. ते मोकळं झालं की सर्वांशी संबंध मोकळेपणाचे होतात.
प्रत्येक व्यक्ती त्या शुद्धतेचा शोधात असतो. म्हणून आपण उघडे असावे, असे मला वाटते. लपवण्याची काहीही गरज नाही, की पळून जाण्याची की गप्प बसण्याची की धूळ फेक करण्याची की कसलाही आव आणण्याची.
कुठलाही वास्तुकलेतील आकार, जो मोकळेपणा अनुभवात _प्रकट_ (it should be a present continuous tense) करेल, तो उत्तम आहे असे मला वाटते. म्हणजे मोकळेपणा सतत प्रकट करावा लागतो, ती काही वस्तू नाही किंव्हा आठवण नाही किंव्हा संकल्पना नाही. त्यासाठी प्रत्येक क्षण मोलाचे ठरते. आधी होऊन गेलेल्या गोष्टी जरी थोर असल्या, तरी आत्ताच्या क्षणी आपल्याला परत मोकळेपणा निर्माण करायला लागतो. म्हणजे स्मरणाच्या पलीकडे जायला लागतं.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home