श्री
श्री
भीती कुठल्या कुठल्या गोष्टींची असू शकते आणि ती समजून घेतली की काही शांतता लागते?...
सिद्ध होण्यात वेळ कमी पडला तर? वेळेत प्रश्न नाही कळले तर, वेळेत उत्तर नाही दिले तर, वेळ वाया गेला तर, हेतू नसला तर, साखळी नीट जमली नाही तर....ह्याचा मूळ कळला तर वरील क्रियांचे कार्य शांतीने होऊ शकेल...
वेळेत सर्व काही ठासून नाही सांगितलं तर आणि जरी सांगितलं तरी काही राहून गेल तर, आणि जरी काही राहून नाही गेल तर ते सर्व सगळं कळलं नाही तर, परत सांगायला नाही वेळ मिळाला तर....ह्याचा मूळ कळला तर वरील क्रियांचे कार्य शांतीने होऊ शकेल...
गोष्टींचे एकमेकांशी संबंध करायलाच हवे का? नाही कळले तर? कळले तर? हा ही महत्त्वाचा प्रश्न आहे. संबंधांचे काहीही घेणे देणे नसले तर? संबंध असायलाच पाहिजे तर? संबंधांचे काही स्थान असते का? ते बौद्धिक असते का? ते जाणिवेतून येते का? संबंधातून मी होतो का? का मी वेगळा आहे?
मनात अनेक वृत्ती येत असतील तर? वृत्ती कधी येतील आणि जातील हे कळले नाही तर? त्यावर ताबा नसेल तर? ते कसे कार्य करते हे कळले नाही तर? सर्व बरोबरच असायला पाहिजे का? मला tevhnology चे काही नाही कळले तर? मी संपर्क करू शकलो नाही तर?
वरील प्रश्नाचे उत्तर कधी मिळतात? कसे जाणवतात? ह्या जन्मात नाही कळले तर? समाधान होण्यासाठी वरील प्रश्नांचे उत्तर कळणे बंधनकारक आहेत का?
इंद्रियांचे स्थान असते आणि त्यावरून आपला वावर ठरतो किंव्हा आपण ठरवतो. सूक्ष्म होणे म्हणजे इंद्रियांची गरज न होणे...
हरि ओम.
श्री
विषयात दंग होण्याची, देहाची, आकुंचित स्मरणाची, इंद्रियांच्या भाषेची, शब्द कळून घेण्याची, काहीतरी खटपट करत राहण्याची, नेहमी योग्य काहीतरी क्रिया करण्याची, नेहमी तैय्यारीत राहण्याची, बिंदूत पूर्णतः अनुभवण्याची, सतत काहीतरी प्रयोजन करण्याची, अपेक्षा करण्याची, साखळी योग्य जोडण्याची, साखळी योग्य होण्याची, कोडी सोडवण्याची, बुद्धी वापरत राहण्याची, मतभेद करण्याची, संबंध जुळवाजुळव करण्याची, सांगण्याची, सर्व काही बोलून टाकण्याची, आतील सूक्ष्म गोष्टींची भाषा मांडण्याची..... *गरज नसते.*
घडामोडींना चालना मी देत नाही. किंबहुना मनाच्या रचनेमुळे दृश्याशी संबंध घडून येतात किंव्हा प्रकट होतात. प्रकट होणे, हे देखील गूढ कार्य आहे - कारण त्या होण्यामध्ये स्मरण होते, भाव होतो, वृत्ती होते त्यात भगवंताची शक्ती आणि माझी प्रक्रिया मिसळलेली जाते. ह्याला _परिस्थिती_ म्हणावे. त्यामुळे आपण धडपड करत राहतो, चक्र निर्माण करतो आणि तसे परिणाम अनुभवतो. चळवळ, हा त्याचा दुसरा शब्द.
ह्यातून शांती कसे लाभेल ते बघावे. त्यासाठी काय करावे, कसे, कुठे, का, हे ओळखावे. म्हणजे सर्व व्यवहाराचा हेतू स्वतः मध्ये शांती प्रकट होणे आहे.
माझ्याच वृत्तीचा प्रभाव ढिला व्हायला हवा. जसा तो ढिला होईल, तशी नवीन सूक्ष्म दृष्टी लाभेल आणि दर्शन घडू शकेल. हे सर्वात महत्वाच कार्य आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home