श्री
श्री
भाव जाणवणे ह्यात क्रिया आली, साखळी आली, संबंध आले, परिणाम आले, घटक आले, सूक्ष्म ते स्थूल स्तर आले. हे कार्य अस्तित्व शक्तीचे असते आणि त्यातून सर्व वरील क्रिया होत राहतात.
ह्याचा असा अर्थ होतो की कार्याचे उगम किंव्हा प्रतिक्रिया देण्याचे उगम सूक्ष्म स्थितीतून निर्माण होते, जी दृश्य भावाच्या पलीकडे असते. दृश्याला मर्यादा आहेत, पण अदृश्य माध्यमाला नाही. म्हणून पर्यायाने, सर्वात महत्त्वाचे कार्य आपल्यासाठी हे आहे की अदृश्य माध्यम व्हायचे, किंव्हा शांत व्हायचे. रूप जरी नसलं, तरी अदृश्य मध्यम असतंच. म्हणून _मी_ जरी नसलो, तरी सत्य असणारच. किंबहुना माझ्या नसण्याने सत्य भाव स्थिरावेल. ह्याचा अर्थ सत्य भाव माझ्या पेक्षा खरं, विशाल, सूक्ष्म, कायम, शाश्वत आहे. मग मी स्वतःला एवढा का चिकटून घेतो?!!...
शांती होण्याची क्रियेला काळ द्यायला लागतो, श्रद्धेतून आत्मसात करायला लागते आणि कृपेची प्रार्थना करायला लागते.
इंद्रियांचे कार्य, दृश्याशी संबंध खूप खोलवर संस्कार करतात. त्यावरून आपण दृश्य जगात वावरत राहतो. म्हणून विचारांच्याही पलीकडे आणि सूक्ष्म कार्य वावरत असतात. त्यासाठी श्रद्धेच स्थान जीवनात आणायला लागते.
हरि ओम.
श्री
संकल्पना बहिर्मुख असते, म्हणजे ती संबंधित असते, बदलत राहते, साखळी दर्शवते, भावातून येते, द्वैतात वावरते, सिद्ध होऊ पाहण्याचे बघते. An idea has all these ingredients.
प्रश्न असा आहे, की जर हेतूच्या पलीकडे जाणीव झाली तर, संकल्पनेला काही स्थान असते का?! अनुभव होणे हे हेतूवरून संकल्पित होऊ शकते किंव्हा निरहेतू च्या जाणिवेतून सुद्धा. म्हणजे अनुभव सिद्ध करायला त्याचा वापर केला जाऊ शकतो किंव्हा त्याच्या शिवाय ही, एक निमित्त सारखे.
माझ्या मते, अनुभव निर्माण होतो, तो वावरत राहतो, तो बदलतो आणि तो निघून जातो. अनुभव म्हणजे अस्तित्व नाही. त्याला "मी" संबोधित करून आपण चूक करतो. ह्याचा अर्थ हा, की अनुभव _व्यक्तिक्त_ वाटू शकतात आणि त्याच्या मुळाशी गेलो, तर अस्तित्व भावात ते सर्व घटक विलीनही होऊ शकतात. म्हणून अनुभव व्ययक्तिक व्याख्याशी निगडित होत असतील, तर ती एकच मर्यादित अस्तित्वाची छटा आहे.
हे आपण मान्य करत नाही, म्हणून खूप मतभेद होतात. बोलणे काय, मतभेद मांडणे काय, एका अर्थ वायफळ बडबड असते. शांत व्हावे आणि काहीही सांगण्याची गरज पडू नये.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home