Friday, July 04, 2025

श्री

 श्री 


 _उगम आणि स्पष्टीकरण_ हे दोन्ही गोष्टी घातक आहेत समाधानासाठी. जेव्हा आपले विचार वरील दोन्ही गोष्टींच्या बंधनाच्या पलीकडे होतात, जेव्हा त्या विचारांना सूक्ष्म स्वरूप येतं, तेव्हा समाधानाचा भाव प्रकट होऊ शकतो. 

म्हणजे अस्तित्व, अनुभव, क्रिया, आकाश, विचार आणि भाव हे मिसळलेले प्रकरण आहे. विचार ही संकल्पना आहे जी जाणिवेतून येते आणि ती संकल्पना "मी" हा भाव निर्माण करत राहते. 

म्हणजे मूळ जे आहे अस्तित्व कळायला, ते आहे "जाणीव". जाणीव शक्ती असतेच स्वतः सिद्ध. म्हणून विचार जरी नाही प्रकट झाले, तरी जाणीव असणारच! म्हणजे अस्तीत्व असणारच! निर्विचार स्थिती काय असते, त्यासाठी खूप सूक्ष्म होणे आले. त्यासाठी नामस्मरण.

हरि ओम

0 Comments:

Post a Comment

<< Home