Thursday, July 03, 2025

श्री

श्री 

दृश्य जगात स्वतःची जाणीव वावरत राहताना, त्याचा अभिप्रेत परिणाम म्हणजे "अनुभव" निर्माण होत राहणे. अनुभवाचे घटक अनेक, साखळी अनेक, स्तर अनेक, आणि त्यातून होणारा भाव, संबंध, क्रिया, स्मरण. ह्याला एक प्रकाराची _शक्ती_ म्हणू. 

अस्तित्व ही शक्ती आहे. ती _दृश्य निर्माण_ करत राहणारी शक्ती आहे. अस्तित्व प्रकार काय आहे, ती वस्तू आहे, का बिंदू, की स्मरण, की कार्य, की साखळी, की स्थिती - हे ओळखणे आपले ध्येय आहे,  कारण आपण त्याच शक्तीतून झालो आहोत. मुद्दामून कुणी ओळखत नसावे, त्याने अस्तित्व कळेलच असे काही नाही. प्रयत्न करत राहावे, जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा त्या जाणिवेत अस्तित्व भाव प्रकट होईल. ह्याचा दुसरा अर्थ हा की स्थळ आणि काळाची मर्यादा (तर्क, संकल्पना) लावणे उचित नाही हा शुद्ध अनुभव आत्मसात करायला. सुरुवातीला नाही, मध्ये नाही, मार्गात नाही आणि शेवटीही नाही. म्हणजे पूर्ण शुद्ध भाव होण्यासाठी तसंच शुद्ध भावनेने सतत त्या शक्तीचे स्मरण ठेवावे. 

तसे व्हायला सवय करायला लागते. त्याचे तीन टप्पे नामस्मरणाचे संत द्नानोबा ने सुचविले आहेत हरिपाठात: गोडी - जोडी - आवडी.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home