Thursday, July 03, 2025

श्री

श्री 

जसे वेताळ टेकडीवर "वेताळ बाबा" एक _दगड_ किंव्हा _शिळा_ म्हणून स्थित आहे, तसेच माझे होईल का, असे मनात येते! 

ह्या युगात इतक्या झपाट्याने गोष्टी बदलत असतात की साधा संवाद करायला जर कुणाला फुरसत नसेल किंवा इच्छा, तर मग मूग गिळून गप्प बसल्या शिवाय काही खरे नाही! वेगात काहीतरी माकड चाळे करणे आणि उड्या मारणे आणि जीभ टाळूला लाऊन काहीतरी बडबड करत बसणे, ह्याने कोवळ्या भावना कसे सामोरे येतील आणि ते कसे जाणवतील कुणाला? कसे गूढ रहस्य किंव्हा सूक्ष्म गोष्टींचे आकलन होईल? ते कसे इतर वेगवान विचारांना पटवता येतील? With speed, the nature of awareness changes too. हे लोकांना ध्यानात येत नसावे कदाचित. की हळुवार विचारांचे महत्व काय, हे कळण्यासाठी अगोदर हळुवार होणे गरजेचे आहे!

ह्याचा स्पष्ट अर्थ हा, की एका मर्यादेच्या पलीकडे आपण काही सांगू शकत नाही आणि प्रत्येकाचे प्रश्न स्वतः सोडवायचे असतात! त्यात काही वावग नाही, असे मला वाटते. जर कुणाची श्रद्धा हळू होण्यात असेल, तर तसे होऊ द्यावे. 

वेगाने कुणी हुशार किंव्हा अडाणी ठरत नाही. उलट आणखीन वेगात विचार करण्याची गरज वाटली तर समजून घ्यावे की आपलेच विचार कुठेतरी घोळ घालत आहेत! कारण, आनंदासाठी विचार लागत नाही! ती स्वतः सिद्ध भावना असायला हवी/ जाणवायला हवी...

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home