श्री
श्री
सर्व येऊ द्यावे. एकात एक गोष्टी होत असतात आणि तो प्रवाह अनंत असतो. बदल, ही नैसर्गिक अस्तित्वाची बाब आहे आणि त्यातून होत राहणारे परिणाम, संबंध, स्मरण. म्हणून भगवंताच्या गूढ कार्यावर श्रद्धा प्रज्वलित ठेवायला लागते, कारण तेच सत्य आहे. पुढे काय होईल, कुठलं रूप आणि आकार अनुभवात येईल, कसे संबंध असतील हे कोण जाणे?! आज मी कितीही खबरदारी घेतली, त्यातून संबंध होण्याचे थांबत नाही आणि त्यातून कुठलेतरी संबंध आपण स्वतःवर ओढून घेत राहतो. म्हणजे "मी" हे शक्तीचे एक _रूप_ आहे. रूप म्हणाल, तर एक प्रकारच कार्य आहे, कृती आहे, जाणीव आहे, परिणाम आहे, संबंध आहे, स्थिती आहे. ते रूप कार्य करत राहत. ते होत राहणार. त्यातून काही व्ययक्तिक मतितार्थ असतो का?
प्रपंच म्हणाल, तर अस्तित्व शक्तीची एक छोटी आवृत्ती आहे. अस्तित्व शक्तित जे काही आहे, त्याचे सर्व गुण छोट्या चौकटीत आपल्या प्रपंचात वावरत असतात. अर्थात अखंडित शक्तीला चौकट निर्माण करणे किंव्हा होणे, ह्याचाच अर्थ विश्व भासणे. अजून मर्यादित चौकट केली, की अहं वृत्ती उदयास येते. अजून मर्यादित केली की आपले विचार सतत देहावरच केंद्रित राहतात. मर्यादे मध्ये संबंधांचे क्षेत्रफळ, वेग, गुंता, बदल, स्मरणाची व्याख्या हे सर्व घडत किंव्हा प्रकट होत राहत.
ह्याचाच अर्थ असा की मर्यादा वाढवणे आले, किंव्हा त्याच्या पलीकडे होणे आले. म्हणजे जाणीव सूक्ष्म होणे, विशाल होणे, शांत होणे.
निर्गुण जरी सत्य अस्तित्व असलं , तरी मार्ग प्रपंचातून, मर्यादेतून, वृत्तीतून शोधायला लागतो. ते शोधणे सर्वांगीण कार्यातून असते. म्हणजे त्यात जीवाच्या सर्व प्रकारच्या जाणिवांचा उपयोग करायला लागतो, फक्त बुद्धी नाही. हे होण्यासाठी नामस्मरण करत राहणे असे संतांचे सांगणे आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home