श्री
श्री
विचार मंथनाचे कदाचित दोन परिणाम होत असावेत - स्वतःला विषय करणे आणि दुसरे म्हणजे सूक्ष्मात परिवर्तन होणे. हे दोन्ही परिणाम एकत्रित होत राहणार. म्हणून सत्याचा अनुभव आत्मसात करणे महत्वाचे.
आपण पाहिले जे वाचतो, ऐकतो, करतो...ते प्रतिक्रिया देण्याच्या दृष्टीने करतो. ह्याला बहिर्मुख पद्धतीने क्रिया करणे असे म्हणतात. ह्यात अस्थिरता, परावलंबन, तात्पुरतेपण, वेगळेपण - असे भावना किंव्हा घटक किंव्हा चक्र किंव्हा साखळी किंवा भाव जाणवतो.
त्याच पद्धतीने पहिले भगवंताकडे बघितले जाते...प्रपंचातील विषय सोडवण्याचा हेतू साठी. नंतर ती नजर अंतर्मुख व्हायला लागते - म्हणजे दोष देणे, त्रागा करणे अशा गोष्टी शांत व्हायला लागतात. शेवटी पूर्ण अंतर्मुख होण्यामध्ये भगवंताची प्रचिती स्थिरावते.
हे सांगताना असे वाटू शकते की सगळ सरळ रेषे सारखे आहे - सामान्य बुद्धीला रेषच दिसते! त्याचा मार्ग पत्करताना चक्र सामोरे येते, प्रवाह जाणवतो आणि श्रद्धा प्रकट व्हायला लागते. थोडक्यात सूक्ष्माची प्रचिती येते. तेच तेच पाहुणे (राग, द्वेष, प्रश्न, संबंध) हे मार्गावर परत, परत येतील...फक्त वेगळ्या रूपात. म्हणून त्यांच्याकडे कसे बघावे, कसे स्वीकारावे, कसे व्यवहार करावे हे प्रत्येक टप्प्यात ओळखायला लागते.
व्यवहार योग्य झाला की पाहुणे घरातून निघाले, नंतर काही दिवसांनी वेगळ्या रूपात येण्यासाठी.
अशा तऱ्हेने आपल्या मार्गाचे स्वरूप आढळून येते.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home