श्री
श्री
काळाच्या, स्थळाच्या, अस्तित्व रूपाच्या
आपल्याला *मर्यादा* असतात. हे शांतीने पूर्ण मान्य करावे लागते. तडफडत कष्टी होणे
किंव्हा सिद्ध होण्याचा प्रयत्न करणे, ह्याने कितपत योग्य
कृती होते, हे ओळखावे. प्रत्येक विचार स्पंदनेचा सर्वांगीण
परिणाम होतो, ज्याचे स्वरूप भगवंताचे माध्यम ठरवते. विचार प्रकट
होण्याचे बीज त्याच्याकडेच असते, म्हणून परिणामांना
सामोरे जायला लागते. परिणाम तो ठरवतो, म्हणून ते
स्वीकारायला लागतात.
मर्यादा असणे, ह्याने न्यूनगंड वाटून घेण्याची गरज नसते. मर्यादा
वाटणे हा नैसर्गिक भाव आपल्याला दिला गेला आहे. त्यातूनच शांतीचा शोध होतो.
त्यातूनच "पलीकडे होण्याची" प्रेरणा मिळते. त्यातूनच विशाल आणि सूक्ष्म
असे स्पंदने मन धारण करू शकते. त्यातूनच योग्य संस्कार मनात स्थित होऊ शकते.
त्यातूनच श्रद्धेचा शोध लागू शकतो. त्यातूनच "मार्ग" ही संकल्पना
तैय्यार होते. त्यातूनच विवेक बुद्धी जागृत होऊ पाहते.
म्हणून मानवी अनुभव येणे, हा मोलाचा टप्पा आहे
अनुभवात. त्यातून काय योग्य करायला हवे, हे ओळखावे.
हरि ओम.
श्री
दृश्यात होणाऱ्या कुठल्याही रूपाच्या घडामोडींची चालना कार्य शक्ती करते. काय
होते, कसे होते, केव्हा होते,
का होते ह्याच्या चिंतेत पडू नये विशेष. आपण पडतो,
कारण स्वतःला आपण वेगळे मानतो किंवा अहं वृत्ती प्रज्वलित ठेवतो. अहं वृत्ती
मुळी स्मरण देते किंवा वेगळेपण देते, म्हणून सर्व संबंध
ते रंग दर्शवतात.
तसेच त्यावरून आपल्याला एक प्रकाराच्या गोष्टी आठवतात किंव्हा संबंध जोडले
जातात किंवा पुढचा विचार होतो. हे अस्थिर फिरण्याची दिशा अहं वृत्ती दाखवते आणि
तसे चक्रात गुंतवून परिणाम भोगायला भाग पाडते.
म्हणून आठवण्यालाही हेतू असतो किंव्हा अहं भाव लपला असतो त्यात. त्यातून
मर्यादा, अस्थिरपणा, देह बुद्धी,
रूप, आकार, स्थळ,
काळ, संबंध असे सारे घटक दिसून येतात.
त्यातील चित्र पुसता येत नाही किंव्हा थांबवता येत नाही. त्याने वाईटही वाटून
घेण्याची जरुरी नाही. चित्र शांत होऊ द्यावे. म्हणजे पाण्यासारखे व्हावे.
हरि ओम.
श्री
We are integrated beyond our imagination. So there is no
use running from something or running after something. Efficiency is a
wholesome idea which requires support of many aspects of the mind. How those
supports work are more than only summations or reductions or sequences or
relations. That introduces the aspect of concentration or focus and
transforming the mind by that training.
The biggest "support" we have is of a medium
referred to as God. The Will of God works and creates things, brings
interactions, changes the same and the cycle continues.
If one thinks of accomplishing something, then awareness
of God's work is important, since any accomplishment happens within the Divine
Will. The basis of thoughts that come, intermingle, change and go are from the
same Will. Therefore to assume thoughts independent of anything is nonsense and
outright arrogant. The erroneous assumption leads to self harm and
exploitation.
विचार _कण_ ह्या सारखे वाटतात की ते अचानक टपकलेले वाटतात,
त्यांना तोडू मोडू शकतो आणि बाहेरील परिस्थितीवर आपण त्याचा वापर करू शकतो. हा
मर्यादित विचाराचा भाव झाला.
विचार संबंध दर्शवतात स्तरांशी, साखळीशी,
रुपाशी, आकारांशी, दृश्याशी. विचारांचा
स्वभाव असतो, ज्यामुळे स्मरण होते आणि ते आपल्याला गुंतून ठेवते.
म्हणजे विचार हे एक प्रकाराचे शक्तीचे कार्य ओळखावे, ज्यामुळे आपल्याला
अनुभवाचे *एक रूप दिसते* आणि परिणाम होतो.
म्हणजे अनुभव निर्माण करणारी शक्ती विशाल हवी आणि सूक्ष्म हवी. ती स्थित हवी
आणि त्यातून विचार प्रकट झालेले असावे. त्यातून हालचाली होत असाव्या आणि घडामोडी
होत असाव्या. त्यातून स्मरण होत असावे, अर्थ होत असावा,
इतर रूप आणि आकारांशी संबंध होत असावा आणि परिणामही.
हे ध्यानात घ्यावे आणि स्वीकारावे. भगवंताचे चिंतन करत,
अनुभवाचे रूप शुद्ध होऊ शकते. तसे करावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home