श्री
श्री
स्वतःसाठी वेळ काढणे, ह्याने आतील विचार, भावना, बदल, संबंध, स्थिती, भाव, हे जाणून येऊ शकतात. जाणणे हा प्रवाह आहे जो स्वतःला विशाल, सूक्ष्म आणि स्थिर करत राहतो. म्हणजे अंतर्मुख होत राहणे हा देखील प्रवाहच आहे, ज्याचे घटक इंद्रिये, देह, भावना, विचार, वासना, संबंध असे असतात. अंतर्मुख होण्यात अवस्था येत राहणार, जे स्वीकारावे लागते.
जीवनाचे दुसरे अंग म्हणजे नाती आणि काम. ह्या संबंधात, महत्वाचे/ मार्गावर नेणारे विचार कुठले आणि अस्थिर किंव्हा गुंतवणारे कुठले, असे सतत ओळखावे लागते.
जीवनाचे तिसरे अंग म्हणजे सर्व स्थितीत संबंधाचा भाव ओळखणे आणि स्वीकारणे. तो भाव फक्त शांतीचा असतो, जरी त्याच्या स्थिती आणि रूपे खूप असली तरीही. म्हणजे जरी अंतर्मुख अस्तित्व आणि बहिर्मुख अस्तित्व _वेगळ्या_ रूपाचे जाणवले, तरीही त्यातील बांधली गेलेली दोरी (कार्य) म्हणजे शांती भाव. म्हणजे सत्य अस्तित्व शांती भावाचे असते, आणि त्यालाच कार्य अशी उपमा दिलेली आहे.
वरील तीन गोष्टी आपल्या अस्तित्वात असणे गरजेचे ठरते - स्वीकार, टीका आणि श्रद्धा. ह्याने अनुभव स्थिर होत राहते आणि शांती भाव प्रस्थापित होते.
ह्याचाच वेगळा अर्थ हा की अस्तित्वाच्या कार्यावर पूर्ण श्रद्धा ठेवणे. कार्याचे प्रतीक खूप स्तरात, स्थितीत, स्वभावात, संबंधात, हालचालीत, रुपात आणि देहात उमटत राहतात. म्हणजे थोडक्यात कार्य भगवंतच करतो.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home