Wednesday, January 28, 2026

श्री

श्री 

अध्यात्मातून परिवर्तन हळू हळू होईल आणि म्हणून सैय्यम ठेवावा. आपण एखादी गोष्ट वाचतो आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. परिणाम "वेगळा" जाणवतो, तरीही व्याकुळ न होता आपण शांतीने कार्य करत राहावे. व्याकुळता अपेक्षेच्या रूपातून येते, तसे संबंध निर्माण केल्यामुळे (चक्र आणि दृश्याशी संबंध). ह्याला दुसरे नाव म्हणजे "मर्यादा". अपेक्षा, ही वृत्ती, नमवायची असते अभ्यासातून. 

आपण गोल आहोत प्रवृत्तीत - सर्व काही घटकांचा, स्तराचा, क्रियांचा, स्थितींचा प्रभाव आपल्यावर पडत असतो, त्यातून जीवाचा भाव (म्हणजे ज्याला _मी_ असे समजून घेतो) प्रज्वलित राहतो किंव्हा प्रकट होतो. _प्रकट होणे_ आणि _प्रज्वलित राहणे_ हे शक्तीचे कार्य आणि रूप समजावे. मूळ शक्ती भगवंताची आहे, तसा शुद्ध शांत भाव आहे - सर्व बाकीचे रूप त्यातून _प्रकट होतात_ आणि त्यावरून _एकमेकांशी साहजिकच संबंधित राहतात_ . म्हणून त्यावरून _एकमेकांवर परिणाम_ ज्याला आपण भोग किंवा प्रारब्ध अशी उपमा देतो. 

कार्य स्थित आहे. म्हणून त्यावरून वासना, विचार, भावना, देह स्थित असणार. म्हणजे _हे प्रकट होणे_, असे असणार अनुभवात . 

 _प्रकट होण्याला_ आपण व्ययक्तीकरण करतो, ह्यातून परिणाम होतो आपल्यावर. हे समजून घेणे आणि स्वीकारणे नैसर्गिक पद्धतीने महत्त्वाचे ठरते. त्रासून उपयोगाचे नाही. 

त्यासाठी नामाचे चिंतन करावे. त्याचा गूढ परिणाम होतो. त्यावर श्रद्धा ठेवणे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home