Thursday, February 05, 2026

श्री

श्री 

समर्पित करावे शक्तीला म्हणजेच की शक्तीचे अस्तित्व ध्यानात येणे, सूक्ष्म होणे, कार्य करणे आणि विलीन होत राहणे. 

इथे संगत किंव्हा संस्कार उपमा महत्वाची मानावी. संगत होते मनाला एका संकल्पनेची जी शक्तीच्या कार्यामुळे प्रकट होण्यास कारणीभूत होते. ती संगत दर्शवते सर्वांगीण क्रिया, स्मरण, साखळी, चक्र, अनुभव, परिणाम, स्वभाव वगैरे. 

म्हणून प्रश्न जीवाला असा आहे की संगत कसली ठेवावी? सत्य ओळखण्याची संगत असावी, असे मला वाटते. ते होण्यासाठी मग नामाचे चिंतन करावे असे सुचविले आहे. म्हणजे नामस्मरण कार्य करावे. अशा कार्याला "योग" म्हणू शकतो. 

हरि ओम.


श्री 

 _अस्तित्व_ आपले भगवंतामुळे असते. अस्तित्व म्हणजे एका प्रकाराचे संबंध प्रज्वलित होणे, अनुभव होणे, भाव होणे, स्मरण होणे वगैरे. मूळ संबंध जो असतो तो भगवंताच्या कार्यात आणि आपल्या जाणिवेत असतो. हा संबंध अर्थातच गूढ असतो आणि त्याला काळ द्यावा लागतो स्वतःला पूर्ण श्रद्धा ठेवण्यासाठी त्या संबंधांवर. म्हणजे सर्व संबंध योग्य फळ देतील ही खात्री होणे गरजेचे आहे. 

अस्तित्व प्रवास असतो आणि प्रवाह अनुभवण्याचा. अनुभव असण्याला हेतू का निर्माण करावे? किंव्हा हेतूचा अर्थ स्थूल ते सूक्ष्म (भगवत इच्छा) असे परिवर्तन होणे असते. *जाणीव* ह्या वरील अस्तित्व परिस्थितीला म्हणावी. 

दुसऱ्या अर्थाने भगवंताच्या स्मरणाला शुद्ध हेतूने बघावे, त्याला सत्यपणा संपादन करावे, आपण विलीन होत जावे, सूक्ष्मता महत्वाची आहे हे ओळखावे, श्रद्धा सर्वांगीण पद्धतीने वाढू देणे, सर्व शांतीने स्वीकारावे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home